शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी कामाच्या आमिषाने महिलेचा विनयभंग

By admin | Updated: May 7, 2017 02:34 IST

सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्स अ‍ॅटो या कारखान्यात तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या महिलेला कायमस्वरूपी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्स अ‍ॅटो या कारखान्यात तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या महिलेला कायमस्वरूपी कामाला लावण्याचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कारखान्याचे असिस्टंट मॅनेजर सुधीर देशमुख यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची सोलापूर येथील राहणारी महिला सणसवाडी येथील ट्रान्स अ‍ॅटो इंटरनॅशनल या कारखान्यात सहा महिन्यांपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात आॅफिसमध्ये काम करीत होती. कारखान्याचे असिस्टंट मॅनेजर सुधीर देशमुख याने या महिलेस तुम्हाला कायमस्वरूपी कामाला लावतो, असे म्हणत जवळीक व ओळख निर्माण केली. यांनतर या महिलेस कारखान्यातील रेकॉर्डरूममध्ये फायली आणायला देशमुख यांनी सांगितल्यावर ती महिला रेकॉर्डरूममध्ये गेली असता सुधीर देशमुख त्या ठिकाणी गेला व त्या महिलेस माझी इच्छा पूर्ण करा, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करूनही महिलेने प्रतिसाद न दिल्याने त्या महिलेला कामावरून काढून टाकले. त्या महिलेने डिसेंबर महिन्यात तुम्ही मला कामावरून का काढले, तसेच माझ्या नावाची बदनामी का करता, याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेच्या थोबाडीत सुधीर देशमुख याने मारली. त्यांनतर या महिलेने हा प्रकार आपल्या पतीस सांगितला होता. ३ मे रोजी सुधीर देशमुख याने त्या महिलेच्या पतीस फोन करून तुझी पत्नी वाईट वागते, असे सांगितले. यानंतर ५ मे रोजी या महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात ट्रान्स अ‍ॅटो इंटरनॅशनल कारखान्याचे असिस्टंट मॅनेजर सुधीर शिवाजी देशमुख (रा. चंदननगर, पुणे) यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून देशमुख याच्यावर महिलेचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे करीत आहेत.