शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास सहा महिने सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी ...

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अमोल घाटे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. नोव्हेंबर व ऑक्टोबर २०१८ रोजी हडपसर परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी चौदा वर्षीय मुलीने फिर्याद दिली.

अमोलने अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करून ‘मी तुझा मित्र असून मी तुला लाईक करतो. मी माझा मोबाईल नंबर देतो. त्याच्यावर व्हॉट्स्अपला हाय म्हणून मेसेज पाठव. उद्या भेटू,’ असे म्हणून पाठलाग केला, विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. यामध्ये त्यांनी सहा साक्षीदार तपासले. याप्रकरणात पीडिता व तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गावडे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी आर. एन. कांबळे यांनी त्यांना मदत केली.