शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्का

By admin | Updated: December 19, 2014 01:58 IST

जिल्ह्यामध्ये जमिनींच्या व्यवहारांसोबतच व्यावसायिकांकडून दाबून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

पुणे : जिल्ह्यामध्ये जमिनींच्या व्यवहारांसोबतच व्यावसायिकांकडून दाबून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायमच राहिलेले आहे. ग्रामीण पोलिसांनी या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडून गेल्या वर्षभरात तब्बल १४ टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील पाच टोळ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, मोक्का लावण्यात आलेल्या ९८ गुन्हेगारांपैकी ६९ गुन्हेगारांना गजाआड केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.रस्त्यांवरील जबरी चोऱ्या, दरोडे यांसोबतच स्थानिक गुन्हेगारीमध्ये आता बदल होऊ लागले आहेत. ‘तेलमाफियां’च्या कारवायांमुळे ग्रामीण पोलिसांच्या कायमच नाकी नऊ येत राहिलेले आहेत. देहूरोड, चाकण, तळेगाव आदी भागांतील ‘ब्लॅक आॅईल’ माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी हालचालीही केल्या होत्या. परंतु पुणे शहराची व्याप्ती झपाट्याने वाढल्यानंतर शहरालगतच्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. जागोजाग शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी विकत घेतल्या जाऊ लागल्या आहेत. या व्यवहारांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसाही खुळखुळू लागला आहे. यातूनच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले आहे. वरचढ होत चाललेल्या या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्याचा (मोक्का) कारवाईचा आधार घेतला. गेल्या अकरा महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी १४ टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.यातील पाच टोळ्यांविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल केले आहे. पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांनी तीन टोळ्यांचा मोक्का नाकारला. तीन टोळ्या तपासावर आहेत. (प्रतिनिधी)