शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोमीनपु-यामध्ये बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे आग

By admin | Updated: June 21, 2017 20:39 IST

शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवार पेठेतील मोमीनपुरा भागातील रोलेक्स बेकरीला बुधवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 -  शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवार पेठेतील मोमीनपुरा भागातील रोलेक्स बेकरीला बुधवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. प्रसंगावधान राखत कार्यकर्त्यांनी रेडीयन्स हयात इमारतीमधील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तातडीने बाहेर काढले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या पाचच मिनिटात घटनास्थळी धाव घेत आग विझविली. मोमीनपुरा भागामध्ये रेडीयन्स हयात नावाची इमारत आहे. त्याच्या तळ मजल्यावर रोलेक्स बेकरी आहे. बेकरीमध्ये कामगार काम करीत असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणातच ही आग संपुर्ण बेकरीमध्ये पसरली. सर्व कामगार बेकरीबाहेर पळाल्याने बचावले. स्थानिक कार्यकर्ते फरीद शेख, आरीफ उमर शेख, फारुक उमर शेख, यासिन भाई शेख, मेहबूब रोड्डे यांनी तातडीने इमारतीमधील सर्व रहिवाशांना आग लागल्याची कल्पना दिली. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांना तातडीने इमारतीबाहेर काढले. दरम्यान, अग्निशामक दलाला याची माहिती कळविण्यात आली. अवघ्या पाचच मिनिटात अग्निशामक दलाचा बंब जवानांसह घटनास्थळी दाखल झाला. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यात आली. आगीमध्ये बेकरीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. बेकरीचे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.