शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळकर, भोसले गटाने गड राखले

By admin | Updated: December 22, 2015 01:32 IST

नव्याने स्थापन झालेल्या आनंदनगर ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत मोहोळकर गटाने एकहाती सत्ता संपादन केली.

वालचंदनगर : नव्याने स्थापन झालेल्या आनंदनगर ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत मोहोळकर गटाने एकहाती सत्ता संपादन केली. नंदीकेश्वर ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकून विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला. तर, जंक्शन ग्रामपंचायतीवर दुर्गामाता ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकून सत्ता भोसले गटाने संपादन केली आहे. त्यामुळे मोहोळकर आणि भोसले यांनी आपापले गड राखल्याची चर्चा रंगली होती. जंक्शन ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर प्रथमच आनंदनगर व जंक्शन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. आनंदनगर ग्रांमपंचायतीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पक्ष पुरस्कृत व ज्येष्ठ नागरिक यांनी पाठिंबा दिलेल्या दत्तकृपा ग्रामविकास पॅनलला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिगंबर देशपांडे यांनी काम पाहिले. या वेळी सुमारे ५ ते ७ नोटा मतदान झाले. आनंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद मागसवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. तर, जंक्शन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय मोहोळकर यांच्या नेतृत्वाखालील नंदीकेश्वर ग्रामविकास पॅनलला २ जागांवरच समाधान मानावे लागले. कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वावर आणि काँगेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांवर मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. आनंदनगरच्या मतदारांनी नंदीकेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. विकासकामांवर लक्ष केंद्रित करून आनंदनगर ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- वसंत मोहोळकर