शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती अध्यक्षपदी मोहोळ

By admin | Updated: March 30, 2017 03:06 IST

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली

पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी माघार घेतल्यामुळे मोहोळ यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली.अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पीठासीन अधिकारी म्हणून सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणुकीचे कामकाज सुरू केले. महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले यावेळी उपस्थित होते. भाजपा तसेच आघाडीच्या अनेक नगरसेवकांनीही निवडणुकीसाठी सभागृहात हजेरी लावली होती. नगरसचिव सुनील पारखी यांनी पाटील यांना साह्य केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने रेखा टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाटील मोहोळ व त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज माघारीसाठी म्हणून १५ मिनिटे वेळ दिला. अखेरच्या पाच मिनिटांत टिंगरे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर लगेचच पाटील यांनी मोहोळ यांची निवड झाली असल्याचे जाहीर केले. स्थायी समितीत भाजपाचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व काँग्रेस-शिवसेनेचे प्रत्येकी १ याप्रमाणे १६ सदस्य आहेत. बहुमतामुळे मोहोळ यांची निवड अपेक्षितच होती. मात्र महापौर व उपमहापौर अशा दोन्ही पदांची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने लढविल्यामुळे ते ही निवडणूकसुद्धा लढवतील अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांनी टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोहोळ यांचा मार्ग मोकळा झाला. कार्यकर्त्यांसमवेत गर्दीने स्थायी समिती अध्यक्ष कार्यालयात जाऊन मोहोळ यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला.स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले मोहोळ प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झाले आहेत. याआधी ते दोन वेळा नगरसेवक होते. यापुर्वीच्या सभागृहात त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ नगरसेवक होत्या. कला शाखेचे पदवीधर असलेले मोहोळ सुरुवातीपासून भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले आहे. भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस म्हणून ते सध्या कार्यरत होते. महापालिका कामकाजाच्या अनुभवामुळे पक्षाने या पदासाठी त्यांची निवड केली. (प्रतिनिधी)