शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये आधुनिक जमातवाद

By admin | Updated: January 9, 2017 03:26 IST

जगात अस्वस्थता निर्माण झाली असून, आजचा काळ प्रचंड उलथापालथीचा आहे. तरुण मुस्लिम पिढीमध्ये आधुनिक जमातवाद वाढत आहे.

पुणे : जगात अस्वस्थता निर्माण झाली असून, आजचा काळ प्रचंड उलथापालथीचा आहे. तरुण मुस्लिम पिढीमध्ये आधुनिक जमातवाद वाढत आहे. सर्व समस्यांचे निराकरण कुराणमध्येच आहे, असे तरुणांना वाटत असल्यामुळे त्यांच्या एका हातात कॉम्प्युटर आहे; पण दुसऱ्या हातात कुराण आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असा सूचक इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल यांनी रविवारी दिला.साधना ट्रस्ट प्रकाशनातर्फे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई लिखित व मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘भारतातील मुस्लिम राजकारण’ आणि ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा लिखित व कुमुद करकरे अनुवादित ‘कालपरवा’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दलवाई यांच्या पत्नी मेहेरुन्निसा दलवाई, रामचंद्र गुहा, डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले अध्यक्षस्थानी होते. पटेल म्हणाल्या, ‘‘अमेरिकेत ट्रम्प यांचा उदय झाला आहे, तर आपल्याकडेही वेगळे लोक सत्तेत नाही. भारतासह जगात मुस्लिमद्वेष वाढत आहे. कट्टर मुस्लिम विचारांचा सखोलपणे अभ्यास करण्याची गरज आहे. देशाची फाळणी व  मुस्लिम नेत्यांची भूमिका याची छाप दलवाईंच्या लिखाणावर दिसून येते.’’ केतकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मुस्लिम समाजाकडे बदलत असलेल्या दृष्टिकोनाविषयी भाष्य केले. अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मनीच्या चॅन्सलर अंजेलिना मर्केल यांनी मुस्लिमांना हाकलून देण्याची  भाषा सुरू केली आहे. आपल्या देशातील लोकांनाही ही मांडणी सोयीची आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यातील तेढ पेटती ठेवणे ही धूर्त राजकीय खेळी आहे.’’ सूत्रसंचालन विनोद शिरसाठ यांनी केले. (प्रतिनिधी)