शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

जनजागृतीच्या ‘संकल्पा’चा आदर्श

By admin | Updated: January 20, 2015 00:42 IST

वडिलांना अर्धांगवायुमुळे अपंगत्व आल्यामुळे घराची जबाबदारी आता स ‘तिच्या’वरच पडली होती. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणा-या तिने स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

पुणे : वडिलांना अर्धांगवायुमुळे अपंगत्व आल्यामुळे घराची जबाबदारी आता स ‘तिच्या’वरच पडली होती. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणा-या तिने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. परंतु ही उमेद एका अपघाताने मावळली. घरातील गॅस गिझरची गळती झाल्याने या तरुणीला प्राण गमवावे लागले. तिच्या अकस्मित जाण्यामुळे बसलेल्या धक्क्यातून सावरत या कुटुंबाने गॅस गिझर वापराबाबत जनजागृती करण्याचा संकल्प करीत एक आदर्श घालून दिला आहे.संकल्पाचे मामा प्रशांत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकल्पाने पुण्यात आल्यावर ‘शेड्स डिझाईन्स अ‍ॅन्ड मोअर’ या नावाने तिने सुरु केलेल्या व्यवसायाचा आईवडिलांना अभिमान होता. संकल्पा उत्कृष्ट कामांच्या पोस्ट फेसबुकवरील तिच्या अकाऊंटवर टाकत होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर सर्व नातेवाईक जमले. ठाण्यामध्ये राहणारे तिचे मामा प्रशांत जोशीही आले. घरात करणारे दुसरे कुणीही नसल्यामुळे त्यांनीच शेवटचे कार्य पार पाडले. संकल्पाचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला, त्या कारणामुळे अन्य कोणाच्याही घरामध्ये दुर्घटना घडू नये म्हणून संकल्पाचे आई वडील व मामांनी गॅस गिझरच्या वापराबाबत जागरुकता बाळगण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. तिच्या मृत्यूला अवघा एक दिवस होतो न होतो तोच कुटुंबियांनी इतरांसोबत ही घटना घडू नये म्हणून सुरु केलेली जागरुकता आदर्शवत आहे.(प्रतिनिधी)गॅसगळतीत अडकलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देणे सर्वात जास्त गरजेचे असते. अशावेळी गॅसगळती तातडीने बंद करावी. घराचे दरवाजे, खिडक्या उघडाव्यात आणि बाहेरची हवा घरात येऊ द्यावी. जी व्यक्ती गॅसगळतीमध्ये अडकली होती, त्याच्या फुफ्फ ुसात गॅस जाऊन त्याचा परिणाम श्वसनावर होऊन गुदमरून लगेचच मृत्यू होऊ शकतो. यामुळे अशा व्यक्तीचा श्वासोच्छ्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी एअर वे ओपन ही पद्धत अवलंबवावी. या पद्धतीमध्ये संबंधित व्यक्तीची मान मागे पाठीच्या बाजूला झुकवावी. यामुळे तोंडातली जीभ वर जाऊन श्वासोच्छ्वास सुरू राहील. आवश्यकता असल्यास तोंडाने श्वासोच्छ्वास करावा. त्या व्यक्तीला हवा मारत राहावी व तातडीने रुग्णालयात दाखल करावे.-डॉ. राजेंद्र जगताप, संचालक, राज्य शासन मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसगिझर बसविताना...४बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी पुरेशी जागा ठेवा.४गॅस गिझरमध्ये गॅस जळताना निर्माण होणारे विषारी गॅस बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करा.४सिलिंडर बाथरूममध्ये ठेवू नका.४सिलिंडर व गिझर यामधील पाईपचे स्टॅण्डर्ड पाळा.४गॅसगळती होत असल्यास सिलिंडरचा कॉक तातडीने बंद करा.४बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसेल तर दरवाजा बंद करू नका.४गॅस गिझर चांगल्या कंपनीचे, मानांकन असलेले घ्या.गॅस गिझर वापरताना बाथरूममध्ये व्हेंटिलेशन असणे गरजेचे आहे. सिलिंडर कधीही बाथरूममध्ये ठेवू नका, तो बाहेर ठेवावा. मात्र जास्त लांब ठेवू नका. गॅससाठी किती पाईप वापरावा याचे स्टॅण्डर्ड ठरवून देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.-शरीफ अत्तार, गॅस गिझर विक्रेते सुरक्षेकडे दुर्लक्षशहरात गॅस गिझरला मोठी मागणी आहे. मात्र गॅस गिझरबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायला हवी, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.