शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांना धमकाविणारी टोळी चालविणाऱ्या वकील महिलेवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:10 IST

पुणे : मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील टोळीप्रमुख अ‍ॅड. दीप्ती काळे हिच्याविरोधात आणखी ...

पुणे : मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील टोळीप्रमुख अ‍ॅड. दीप्ती काळे हिच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दीप्ती काळे आणि नीलेश शेलार यांच्यावर मोक्का लावला आहे.

अ‍ॅड. काळे हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांशी शारीरिक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. तसेच आणखी ५८ गुंठे जमीन नावावर करून देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीप्ती सरोज काळे (रा. बावधन), नीलेश शेलार (रा. कोथरूड), नितीन हमने व दोघा अनोळखी व्यक्तीविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील त्यांच्या सोसायटीत २०१९ पासून जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. मराठे ज्वेलर्सचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावर बेतलेली हकीकत कथन केली. या बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. या महिलेने फिर्यादीच्या पतीशी जवळीक साधली. त्यांना बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले. त्या बदल्यात त्यांचे पतीकडून मरकळ, कोयाळी येथील १०० गुंठे जमिनीपैकी प्रथम २६ गुंठे व त्यानंतर १६ गुंठे अशी एकूण ४२ गुंठे अशी ३ कोटी रुपयांची जमीन तिच्या नावावर करायला भाग पाडले. त्यानंतर उरलेली ५८ गुंठे जमीन तिच्या नावावर करून दे नाही, तर तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला आयुष्यभर जेलमध्येच सडवेल, अशी धमकी दिली. नीलेश शेलार व नितीन हमने यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण केली. या महिलेच्या नावावर ५८ गुंठे जमीन करून द्या, नाही तर तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच या महिलेने तिचे व फिर्यादीच्या पतीचे एकत्रित असलेले फोटो पाठवून मानसिक त्रास दिला. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी तयार करून उपायुक्त प्रियंका नारनवर यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला होता. डॉ. शिंदे यांनी त्याची छाननी करून त्याला मंजुरी दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

बेकायदेशीर सावकारीतील पैसा देऊन दामदुपटीने व्याज

मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना बेकायदेशीर सावकारीतून मिळालेला पैसा व्याजाने देऊन त्यांच्याकडून दामदुपटीने व्याज घेतले. प्रसंगी व्याजापोटी दुकानातील सोने उचलून नेल्याप्रकरणी दीप्ती काळेसह नीलेश शेलार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १० वर्षांत संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करून खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करून अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत.