शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मामा-भाचे टोळीवर मोक्का, दोघांवर खुनी हल्ला करून लुटली होती कॅश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

पुणे : दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणा-या मामा-भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...

पुणे : दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणा-या मामा-भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरात ही नवीन टोळी सक्रिय झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३ एप्रिल रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पुणे-सातारा रोडवरील अरण्येश्वर कॉर्नर येथील सुप्रील इंडस्ट्रियल इस्टेट येथे ६ व्यक्तींनी दुकानात घुसून दुकानाचे मॅनेजर व कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्याकडून 57,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याबाबत दुकानाच्या व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 4 एप्रिलला 7 वाजण्याच्या सुमारास सुमारास स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थिएटरसमोर पुलाखाली एका 50 वर्षीय वृत्तपत्र विक्रेत्याला चाकूने धमकावून त्यांच्याजवळील पेपर विक्रीचे जमलेले एकूण 90,300/- रु. असलेली बॅग अनोळखी व्यक्तींनी हिसकावून नेली होती. याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना दत्तवाडी पोलिसांनी गौरव फडणीस (वय 30, रा. पर्वती दर्शन, पुणे) व अक्षय गरुड (वय 20, रा. व्हीआयटी कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, पुणे) या दोन आरोपींना अटक केली होती. या दोघांसह सचिन पांडुरंग सोंडकर (वय 31, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), महादेव सुरेश नंदुरे (वय 20, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे) चिराग संजय देशमुख (रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यातील चार आरोपींवर वारजे पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल आहे. या आरोपींकडे पोलिसांनी आणखी चौकशी केली असता आरोपी हृषीकेश ऊर्फ हुक्या श्रीकांत गाडे (रा. व्हीआयटी कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याने स्वत:च्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापती, अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविणे यांसारखे गुन्हे करून वर्चस्व निर्माण करणे असे गुन्हे केल्याची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद आहे. आरोपी गाडे याने स्वतंत्रपणे 57 गुन्हे केल्याची अशी एकूण 66 गुन्हे केल्याची नोंद पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी या गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सादर केला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्याप्रमाणे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्वारगेट विभागाच्या सहा. पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

--------------------------------------------------------------------------------------