शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल फॉरेन्सिक लॅबद्वारे तपासणी

By admin | Updated: July 14, 2016 00:50 IST

अपुऱ्या सुविधांमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक पुरावा (फॉरेन्सिक एव्हिडन्स) गोळा करणे; तसेच तो न्यायालयात सादर करणे अवघड जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शिक्षेचे

पुणे : अपुऱ्या सुविधांमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक पुरावा (फॉरेन्सिक एव्हिडन्स) गोळा करणे; तसेच तो न्यायालयात सादर करणे अवघड जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शिक्षेचे प्रमाण घटण्यावर होत होता. त्यामुळे पोलीस दलाला अत्याधुनिक आणि जलद अशा फॉरेन्सिक टीमची आवश्यकता होती. शासनाने तब्बल ११ कोटी रुपयांची तरतूद करून ‘मोबाईल फॉरेन्सिक लॅब’ तयार केल्या आहेत.अत्याधुनिक साधन-सुविधांसह सज्ज असलेल्या वाहनांचे उद्घाटन बुधवारी पोलीस महासंचालक (लीगल व टेक्निकल) प्रभात रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सीआयडीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, रितेश कुमार, अधीक्षक प्रसाद अक्कानवरू, राजेंद्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या उपसंचालक डॉ. संगीता घुमटकर, के. व्ही. कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पी. एल. अष्टपुत्रे उपस्थित होते. गंभीर गुन्हे घडल्यानंतर घटनास्थळी ही वाहने जातील. त्यातील अत्याधुनिक साहित्याच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात येतील. यामुळे तपासात मोलाची मदत मिळणार असून, ठोस फॉरेन्सिक पुरावे उपलब्ध झाल्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्यात मदत होणार असल्याची माहिती या वेळी प्रभात रंजन यांनी दिली. (प्रतिनिधी)शासनाने या प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद केली असून, एकूण ४५ वाहने तयार करण्यात येत आहेत. यातील दहा वाहने तयार झालेली असून, ही वाहने पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि सोलापूर आयुक्तालय; तसेच उस्मानाबाद, नांदेड, पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयामध्ये देण्यात येत आहेत. फॉरेन्सिकसाठी आवश्यक असलेली नार्कोटिक्स, बॉम्बशोधक यासोबतच सर्व गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठीची सर्व किट्स या वाहनांमध्ये बसविण्यात आली आहेत. या वाहनांमधून चार जण प्रवास करू शकतील; तसेच त्यांना गाडीमध्येच मुक्कामाचीही सुविधा देण्यात आली आहे. वाहनामध्ये एक अंगुलिमुद्रातज्ज्ञ, एक छायाचित्रकार आणि दोन न्यायवैद्यक तज्ज्ञ प्रवास करू शकतील, असे सीआयडी प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले.