शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार करून टोळक्याने तरुणाचा केला खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पैसे न देता खाद्यपदार्थ घेऊन जात असताना विरोध केलेल्या सोनू शेखचा शोध घेत असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पैसे न देता खाद्यपदार्थ घेऊन जात असताना विरोध केलेल्या सोनू शेखचा शोध घेत असलेल्या टोळक्याने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

याप्रकरणी उझेर हसीन खान (वय १९, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांचे गुलटेकडीत रब्बानी केटरर्स हे दुकान आहे. गोविंदसिंग टाक हा पैसे न देता त्यांच्या दुकानातील खाद्यपदार्थाचे भांडे घेऊन जात होता. त्याला सोनू शेख याने विरोध केला. या कारणावरून २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता टाक इतर पाच साथीदारांना घेऊन आला. त्याने हातात कोयते व पालघन हवेत फिरवून परिसरात दहशत पसरविली. फिर्यादी व त्यांचा नातेवाईक साहिल शेख हा त्यांना पाहून पळून जाऊ लागले. तेव्हा टाक याने त्यांना अडवून त्यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चुकला. ते पाहून साहिल पळून जाऊ लागल्यावर टाक याने त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर टाक याने त्याचा पाठलाग केला. तेव्हा फिर्यादी हे अंधारात टपरीखाली लपून बसले व साहिल आत गल्लीमध्ये पळत गेला. त्यानंतर गोविंदसिंग टाक याने परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीखक ए. के़ रसाळ पुढील तपास करीत आहेत.