शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने टोळक्याने केली जबर मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST

पुणे : मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी दिलेले ५ हजार रुपये परत मागितल्याने चौघांनी तरुणाला घरात शिरून जबर मारहाण केली. याप्रकरणी ...

पुणे : मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी दिलेले ५ हजार रुपये परत मागितल्याने चौघांनी तरुणाला घरात शिरून जबर मारहाण केली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदर्श नागनाथ माळी (रा. चव्हाणनगर, डीएसके विश्व रोड, धायरी), विशाल (रा. कोथरुड), प्रतीक वाडकर (रा. बिबवेवाडी) आणि अजय कोळी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी राजन विनोद शहा (वय २०, रा. क्रिस्टल बिल्डिंग, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

राजन शहा व आदर्श माळी हे तोंडओळखीचे मित्र आहे. घटनेच्या तीन-चार दिवसांपूर्वी मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी शहा याने माळी याला ५ हजार रुपये दिले होते. ते त्याने परत मागितले. या कारणावरून २८ मे रोजी रात्री अकरा वाजता शहा हे घरात असताना माळी व इतर आरोपी आले. शहा याला शिवीगाळ करून माळी याने तुला पैशाचा लय माज आला आहे. तुला मी काही पैसे देणार नाही, असे म्हणून लोखंडी हत्याराने डोक्यात मारून जखमी केले. शहा याचे मित्र वैभव तरंगे, विकास चव्हाण, हर्षद खोमणे, तुषार खसण हे भांडणे सोडविण्यासाठी आले असताना विशाल व प्रतीक यांनी वैभव याला पकडून हातातील लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून धमकी देऊन निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक तनपुरे अधिक तपास करीत आहेत.