शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मनसे कार्यकर्त्यांनी उलगडले पराभवाचे ‘राज’

By admin | Updated: November 19, 2014 04:21 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीशिवाय थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी कार्यकर्त्यांनी राज यांच्यासमोरच पराभवाचे राज उघडले. तसेच, पदाधिकारी व नगरसेवकांच्या कामगिरीचा हिशेब मांडला. विधानसभा निवडणुकीत राज्यभरात मनसेला केवळ एकच जागा मिळाली. या पराभवाची कारणमीमांसा करून नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी राज ठाकरे चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर मंगळवारी दाखल झाले. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्या वेळी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व काही नगरसेवक त्यांच्यासोबत उपस्थित होते. मतदारसंघनिहाय वेगवेगळ्या बैठका रद्द करून लॉ कॉलेज रस्ता येथील ‘राज महल’ येथे सकाळी १० पासून कसबा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. आतापर्यंत राज यांच्याजवळ जाण्यास घाबरत असलेल्या कार्यकर्त्यांना थेट बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी व तडजोडीविषयी रोखठोक मते मांडली. राजभेटीने कार्यकर्त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढलेला दिसत होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या राजभेटीने मनसे पदाधिकारी व नगरसेवक चिंतेत होते.(प्रतिनिधी)