शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मनसे विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ

By admin | Updated: November 18, 2016 06:11 IST

विधानपरिषदेच्या पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला.

पुणे: विधानपरिषदेच्या पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची बदनामी नको या कारणारे हा निर्णय घेतला असल्याचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे यांनी सांगितले.शिंदे तसेच पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क नेते बाळा नांदगावकर, नगरसेवक राजेंद्र वागस्कर, रविंद्र धंगेकर, वसंत मोरे आदींची ठाकरे यांच्या समवेत बुधवारी सायंकाळी मुंबईत बैठक झाली. ठाकरे यांनी निवडणुकीतील मतदानाची माहिती घेतली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने वागस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र तो बाद झाला. त्यामुळे आता निवडणुकीत पक्षाचा उमेदवार नाही अशी माहिती त्यांनी ठाकरे यांना दिली. आपला उमेदवार नाही, तरीही मतदान केले तर पक्षावर विनाकारण आरोप होत राहतील, त्यामुळे पक्षाने या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालावा असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता पक्षाचा जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी मतदान करणार नाही अशी माहिती शिंदे यांनी दिली. वागस्कर यांचा अर्ज बाद करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला असे त्यांनी सांगितले.मनसेचे पुणे महापालिकेतील २९ नगरसेवकांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ४, जून्नर २, आळंदी १, पुरंदर १ असे एकूण ३६ उमेदवार या निवडणुकीत मतदार आहेत. त्यांना कोणालाही आता मतदान करता येणार नाही. दरम्यान काही नगरसेवकांनी मध्यंतरी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाची कारवाई होऊन ६ वर्षे बाद होऊ या भितीने त्यांनी नंतर मनसेतच असल्याचे जाहीर निवेदन केले. ते आता काय भुमिका घेतात याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. न्यायालयाने या निवडणुकीसाठी गुप्त मतदान असेल व कोणत्याही पक्षाला व्हिप (पक्षादेश) काढता येणार नाही असा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)