शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मनसे शहराध्यक्षाविनाच!

By admin | Updated: March 11, 2016 01:37 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन बुधवारी शहरात शहराध्यक्षाविनाच साजरा झाला. अनेक वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्षपद रिकामेच आहे.

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन बुधवारी शहरात शहराध्यक्षाविनाच साजरा झाला. अनेक वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्षपद रिकामेच आहे. नेतृत्वहीन मनसेचे इंजिन संथ गतीने मार्गक्रमण करीत आहे. मनसेची स्थापना ९ मार्च २००६ ला झाली. त्याला बुधवारी १० वर्षे झाली. या कालावधी सतीश फुगे व मनोज साळुंके हे दोनच अध्यक्ष शहरास लाभले. सन २००७ च्या महापालिका निडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने फुगे यांनी राजीनामा दिला, तर पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल साळुंके यांची २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हकालपट्टी झाली. अद्यापपर्यंत शहराध्यक्षपद रिक्त आहे. हे पद भरण्यासाठी अनेक मुलाखती आणि बैठका मुंबई, पुणे आणि शहरात झाल्या. विधानसभा निवडणूक, गणेशोत्सव, दिवाळी, २०१६ नवीन वर्षापूर्वी, पुढे नवीन वर्षानंतर असे वेगवेगळे कारण देत पदावर नियुक्ती केली गेली नाही. वारंवार आग्रही मागणी करुनही त्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सहनशक्ती मावळत चालली आहे. मुलाखती आणि बैठका घेणे बंद करा, कोणत्याही परिस्थितीत शहराध्यक्ष निवडाच, अशी मागणी करून कार्यकर्ते थकले आहेत.गेल्या महिन्यात मराठी राजभाषा दिवस शहरात उत्साहात साजरा केला गेला. पक्षाचा वर्धापन दिनही बुधवारी काही ठिकाणी साजरा झाला. या आणि महिला दिनानिमित्ताने एकत्रित कार्यक्रम घेतले गेले. मात्र, पक्षाला शहराध्यक्षच नसल्याने सर्व कार्यक्रम त्यांच्याविना होत आहेत. नेतृत्वहीन असलेल्या पक्षाच्या इंजिनास संथगतीने वाटचाल करीत आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, मनसेचे इंजिन कर्णधाराविनाच अडखळत शहरात मार्गाक्रमण करीत आहे. (प्रतिनिधी)