शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निधी आमदाराचा, पळविला स्थायी समितीने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST

पुणे : एरवी नगरसेवकांकडून वर्गीकरणाद्वारे निधी पळविण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता चक्क आमदारांचाच निधी पळविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस ...

पुणे : एरवी नगरसेवकांकडून वर्गीकरणाद्वारे निधी पळविण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता चक्क आमदारांचाच निधी पळविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीच प्रभागातील विकासकामांसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि नगरसेविका मुक्ता टिळक यांनी अंदाजपत्रकात सुचविलेला निधी पळविला असल्याचा प्रकार समोर आला आहे. टिळक यांनी याबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.

आमदार टिळक या नगरसेविकाही आहेत. त्यांनी पत्र देत पालिकेच्या २०१०-२१ च्या अंदाजपत्रकात कसबा विधानसभा मतदारसंघात विविध भागात सीसीटीव्ही बसविण्याचे दोन कोटींचे काम प्रस्तावित केले होते. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला.

या कामाला आयुक्तांची मान्यता घेण्यासाठी दोन तुकडे करत विद्युत विभागाने एक-एक कोटींची दोन पुर्वगणकपत्र तयार केली. त्यालाच आमदार टिळक यांनी आक्षेप घेत एका कामासाठी एकच निविदा काढा अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. विद्युत विभागाने टिळक यांची तक्रार आल्यानंतर हा प्रस्ताव बाजूला ठेवत अंमलबजावणी केली नाही.

दरम्यान टिळक यांनी आमदार निधीतून ८० लाखांचा निधी डीपीडीसी मधून दिला. त्याची खरेदी प्रक्रीया सुरू असतानाच; स्थायी समितीमध्ये दोन नगरसेविकांनी यातील एक कोटी रूपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव दिला. त्यानुसार, हा निधी पुन्हा कसबा विधानसभा मतदारसंघात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामासाठी देण्यात आला. यामध्ये पोलीस ठाण्यांसह चौक्‍यांची नावे वाढविण्यात आली. त्याच वेळी विद्युत विभागाने निविदा प्रक्रीया राबवून ८८ लाखांच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दाखल मान्य करून घेतला. मुख्यसभेत हे एक कोटींचे वर्गीकरणही मंजूर करण्यात आले आहे.

या सर्व गोंधळाची माहिती मिळताच टिळक यांनी तातडीनं आयुक्तांना पत्र पाठवित तुकडे करून निविदा काढू नये अशी मागणी केली. मुख्यसभेतील वर्गीकरणाचा विषय मंजूर करू नये अशी मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.