शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

आमदार राजीनामा देऊच शकत नाहीत

By admin | Updated: April 24, 2015 03:34 IST

सत्तेसाठी इकडून तिकडे पळणारे आमदार लक्ष्मण जगताप अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून राजीनामा देऊ शकत नाहीत, असा टोला अनधिकृत बांधकामावरून

पिंपरी : सत्तेसाठी इकडून तिकडे पळणारे आमदार लक्ष्मण जगताप अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून राजीनामा देऊ शकत नाहीत, असा टोला अनधिकृत बांधकामावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आमदारांना लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद आज झाली. त्या वेळी ज्येष्ठ नेते पानसरे यांनी जगतापांवर टीकास्त्र सोडले. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटला नाही, तर राजीनामा देण्याची तयारी आमदारांनी दर्शविली होती. हा प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस जगताप यांचा राजीनामा मागणार का? या प्रश्नावर पानसरे म्हणाले, ‘‘जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील अशीच घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एक वीट पडली, तरी मी राजीनामा देईन, अशी घोषणा केली होती. मात्र, सत्तेसाठी इकडून तिकडे जाणारे आमदार राजीनामा देतील, असे वाटत नाही.’’पानसरे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने केलेल्या कामांची प्रसिद्धी पक्षाला करता आली नाही. त्याचा फटका बसला आहे. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीतही कुंटे समिती आघाडी सरकारने स्थापन केली होती, असे त्यांनी म्हटले. मात्र, आमचे विरोधी पक्ष काम न करता प्रसिद्धीमध्ये पुढे आहेत. राष्ट्रवादीने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते.’’शहराध्यक्ष निवडीविषयी पानसरे म्हणाले, ‘‘मी या पदासाठी इच्छुक नाही. माजी महापौर संजोग वाघिरे, माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव, माजी नगरसेवक नाना काटे, पंडित गवळी हे इच्छुक आहेत. मात्र, निवड ही पवारच करतील. राष्ट्रवादी निर्धार मेळावा रविवारी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी तीनला होणार आहे.’’विरोधकांकडून झालेल्या टीकेबाबत सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, ‘‘आंबे असलेल्या झाडालाच लोक दगड मारणार. यामुळे काम करणाऱ्यांचीच नेहमी चर्चा होते. कोणत्याही गोष्टीत संबंध नसताना बदनामी राष्ट्रवादीची केली. प्रभाग निवडणुकांवरूनही वाद उठवला गेला. किरण मोटे इच्छुक असतानाही बळजबरीने त्यांना ओढून आणले, अशी चर्चा केली. ताथवडे डीपी प्रकरणात माझा संबंध नसताना नाव ओढले जात गेले. वायसीएम खरेदी, बाग-बगिचा वृक्षारोपण आदी गोष्टींमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जातात.’’या वेळी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, विधी समिती सभापती सुजाता पालांडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)