लोणी काळभोर : एका अज्ञात इसमाने 11 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रय} केला; परंतु मुलीने समयसूचकता दाखवून त्याच्या हाताला हिसका देऊन मुलींमध्ये जाऊन लपल्याने हा प्रय} असफल ठरला.
पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार आज सकाळी 1क्.3क् वाजण्याच्या सुमारास घडला. त्याने तिला सोलापूर-पुणो महामार्गावरील लोणी फाटा येथे आणले. दुचाकी दुस:या अनोळखी इसमाकडे दिली व तिला महामार्गाच्या पलीकडे ओढत नेले. तेथून तिला रेल्वे लाइनलगतच्या खड्डय़ात नेले व पांढ:या रंगाची लहान आकाराची गोळी दिली. ती खात नाही, हे पाहून त्याने जबरदस्तीने तोंडात ढकलली. तिने ती काढून दूर झुडपात फेकून दिली. तेथून त्याने कोणाला तरी फोन लावला, ती भाषा मुलीला समजली नाही. तो मोबाइलवर बोलत असल्याचा मोका साधून तिने त्याच्या हातास हिसका देऊन आपली सुटका करून घेतली व खड्डय़ातून वर येऊन पळत जाऊन महामार्गावर उभ्या असलेल्या मुलींमध्ये जाऊन लपली. तो अनोळखी इसम खड्डय़ातून बाहेर आला व महामार्गावरून उरुळी कांचन बाजूकडे जाताना दिसला. ती खूप घाबरली असल्याने शेजारील मुलींना तिने काहीही सांगितले नाही. त्यापैकी एकीला तिने रस्त्याच्या पलीकडे लोणी काळभोरकडे सोड, अशी विनंती केल्याने तिला महामार्गाच्या अलीकडे सोडल्यानंतर ती चालत शाळेकडे आली. तेथे बहीण भेटल्यानंतर तिला घडलेला प्रकार सांगितला व दोघी घरी गेल्या. या अनोळखी इसमाचे वय अंदाजे 3क् ते 35 वर्षे, वर्ण काळा सावळा, दाढी थोडी वाढलेली, थोडेसे टक्कल पडलेले, अंगात पांढ:या रंगाची शर्ट व पॅन्ट घातलेली असे त्याचे वर्णन आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. गोपाळ करत आहेत.
4पाचव्या इयत्तेत शिकत असलेली ही मुलगी शाळेच्या बाहेर सहावीत असलेल्या आपल्या मोठय़ा बहिणीची वाट पाहत शाळेबाहेर उभी होती. एक अनोळखी इसम तेथे आला व तिला ‘चल, मी तुला तुङया पप्पांकडे सोडवतो,’ असे म्हणाला. तिने नकार दिल्यावर त्याने तिचा हात धरून जबरदस्तीने ओढत शाळेजवळच्या रस्त्यावर लावलेल्या निळ्या रंगाच्या एम 80 सारख्या दिसणा:या गाडीवर बळजबरीने बसविले व ‘ओरडलीस तर मारीन’ अशी धमकी दिली. तिला भीती वाटल्याने ती गप्प बसली. मात्र, संधी मिळताच तिने अपहरणकत्र्याच्या तावडीतून यशस्वी पलायन केले.