शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: February 20, 2015 00:19 IST

शाळेमधून घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडली.

पुणे : शाळेमधून घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची बलात्कार आणि खुनाची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.सोमनाथ सर्जेराव पासलकर (वय २३) व संजय अंकुश हळंबे (वय २७, रा. रायकरमळा, धायरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धायरी मधील रायकरमळ्यात राहण्यास आहे. तिचे वडील बिगारी काम करतात, तर आई लहान मुलांना सांभाळण्याचे काम करते. पीडित मुलगी सहावीमध्ये शिकते. तिची आजी जवळच राहण्यास आहे.पीडित मुलगी शाळेमध्ये जाताना आरोपी तिला पाहात होते. बुधवारी संध्याकाळी ती शाळेमधून घरी जात असताना, आरोपींनी रस्त्यावर कोण नसल्याचे पाहून तिचे तोंड दाबून मोटारसायकलवर नांदेड फाट्याजवळ कॅनॉलकडेला नेले. तिथे या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या दोघांनी तिला पुन्हा घरा जवळ रस्त्यावर आणून सोडले. घरी गेल्यानंतर ही मुलगी ओक्साबोक्सी रडू लागली. मोठ्या बहिणीकडे तिने अत्याचाराची माहिती दिली. मोठ्या बहिणीने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती कळविली. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुलीच्या घरी धाव घेतली.परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक निरीक्षक जे. सी. गडकरी, उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे, कैलास मोहोळ, किरण देशमुख, राम पवार, पांडुरंग वांजळे, काशिनाथ उभे, दयानंद तेलंगे-पाटील यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले. आरोपी पासलकर व हळंबे हे दोघेही एकाच भागात राहणारे आहेत. पासलकर हा रिक्षाचालक आहे, तर हळंबे हा पेंटर असून, त्याला एक मुलगाही आहे.