शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:42 IST

तुषार भापकर या अल्पवयीन गुन्हेगारावर यापूर्वी जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत

हडपसर : कोयता हातात घेऊन फिरणे, महिलांची छेड काढणे, दहशत माजवणे अशा अल्पवयीन गुन्हेगाराच्या उपद्व्यापामुळे मांजराईनगरमधील शिनगारे कुटुंबीय वैतागले होते. शिनगारे यांच्या बांधकामासाठी आणलेल्या विटा तोडल्यानंतर अखेर शिनगारे कुटुंबातील तीन भावांनी मिळून धारदार शस्त्राने वार करून तुषार मोहन भापकर या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मांजरी गाव येथे घडली.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलेली आहे. सनी दिनकर शिनगारे (वय २९), विनोद दिनकर शिनगारे (वय २७), दादा ऊर्फ महेश दिनकर शिनगारे (वय २६, सर्व रा. मांजराईनगर, मांजरी बुद्रुक) या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. तुषार भापकर या अल्पवयीन गुन्हेगारावर यापूर्वी जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. हातात कोयता घेऊन फिरणे दहशत माजवणे, नशाबाजी करणे यामुळे परिसरातील नागरिकच काय त्याचे कुटुंबीयही त्याला वैतागलेले होते. अनेक वेळा पोलिसांनी त्याला समजावून सांगितले होते. अल्पवयीन असल्याचा फायदा त्याला प्रत्येक गुन्ह्यात मिळत असे. दोन महिन्यांपूर्वी तो डोंगरी येथील बालसुधारगृहातून पळून गेला होता. त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते. मागील महिन्यातच तो बालसुधारगृहातून सुटला होता. शिनगारे कुटुंबीय राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर तुषार कोयता घेऊन नशाबाजी करून बसलेला असायचा. त्याच्या या टवाळखोरीमुळे शिनगारे कुटुंबीय वैतागलेले होते. घटनेच्या आदल्या दिवशी तुषारला सनी शिनगारे याने समज दिलेली होती. तरीही बुधवारी तो पुन्हा त्या मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत येऊन बसलेला होता. सनी शिनगारे व त्याच्या भावांनी त्याला पुन्हा समजून सांगितले, मात्र याउलट तुषारने शिनगारे यांच्यावर अरेरावी केल्यामुळे तिन्ही भावांनी मिळून त्याचा डोक्यावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला.अल्पवयीन आरोपीच्या श्रद्धांजलीचे बॅनरसराईत गुन्हेगार तुषार भापकर याचा खून झाल्यानंतर त्यास श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावले होते. संबंधित बॅनरचे फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बॅनरवर ‘तू कल चला जाएगा... तो मै क्या करूंगा... आय अ‍ॅम बॅक आणि शोकाकुल : सरकार ३०२’ असा मजकूर होता. या बॅनरबाजीबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते काढून घेतले होते.