शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

केबलचालकांना कर भरण्यास मंत्र्यांकडूनच मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:21 IST

करमणूक कर थकबाकी व विनापरवाना केबलचालकांना जिल्हा प्रशासनाने सील ठोकले आहे; परंतु सर्व केबलचालकांनी प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात थेट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचेच दार ठोठावले

पुणे : करमणूक कर थकबाकी व विनापरवाना केबलचालकांना जिल्हा प्रशासनाने सील ठोकले आहे; परंतु सर्व केबलचालकांनी प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात थेट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचेच दार ठोठावले असून, खडसे यांनी केबलचालकांना १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचे काम सोपे झाले असून, पंधरा दिवसांनंतर कर न भरल्यास शासकीय मालमत्तेच्या अपहार कलमाखाली थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटिसा देऊनदेखील कराची थकबाकी व पोस्टाचा परवाना न घेतल्याने हातवे केबलसह डेन आणि इन केबलचालकांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर थकविला आहे. यामुळे जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील यांनी तीनही केबलचे कंट्रोल रूम सील केली असून, कराची थकबाकी व परवाना घेतल्याशिवाय सील काढणार नसल्याचे सांगितले. सध्या आशिया क्रिकेट कप आणि प्रो कबड्डी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने तब्बल दीड लाखापेक्षा अधिक ग्राहकांना फटका बसला आहे. केबलचालकांना ग्राहकांनी धारेवर धरले आहे. यामुळेच सर्वच केबल- चालकांनी थेट महसूल मंत्र्यांकडेच धाव घेतली. मागील आठवड्यात एकनाथ खडसे विविध विषयावर आढावा बैठका घेण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते; परंतु अचानक तब्येत बिघडल्याने सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. दिवसभर त्यांनी येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये आराम केला. याचवेळी सर्व केबलचालक खडसे यांची भेट घेण्यासाठी दिवसभर सर्किट हाऊसमध्ये बसून होते. अखेर सायंकाळी उशिरा खडसे यांनी केबल- चालकांना वेळ दिली. तेव्हा प्रशासनाकडून विनाकारण त्रास दिला जात असून, वेळोवेळी कंट्रोल रूम सील केली जात असल्याचे सांगितले. यावर येत्या पंधरा दिवसांत सर्व कर भरा, त्यानंतर कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. यामुळे जिल्हा प्रशासनाची सोयच झाली असून, पंधरा दिवसांमध्ये कराची थकबाकी न भरल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.