शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च आठ लाख; शासनाची मदत दीड लाखाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

''म्युकरमायकोसिस'' या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय पुणे महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. ...

''म्युकरमायकोसिस'' या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय पुणे महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. या आजारावरील उपचारांसाठी तीन लाखांपर्यंत पालिका मदत करणार आहे. शहरातील १४० रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार घेता येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंर्तगतही म्युकरमायकोसिसचे उपचार समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही मदत कधी आणि कशी मिळणार, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार किंवा शासन ठरवेल त्या दराने बिल आकारावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ॲम्फोटेरोसिन इंजेक्शनचे ६० हजार व्हायल्स १ जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत. या आजारावर मोफत उपचार झाले पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

-----

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण - ३५३

मृत्यू - २०

----

एका रुग्णाचा खर्च आठ ते दहा लाख

म्युकरमायकोसिसच्या उपचारात ॲम्फोटेरोसीन-बी या इंजेक्‍शनचा वापर केला जातो. त्याची ५० मिलिग्रॅमची एक व्हायल २५०० ते ३००० रुपयांना पडते. अंदाजे ७० किलोग्रॅम वजन असलेल्या व्यक्तीला दिवसाला सहा ते दहा व्हायलची गरज भासते. याचा अर्थ इंजेक्शनचा दिवसाचा खर्च ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही उपचार पद्धती पंधरा दिवसांपर्यंत चालते. म्हणजेच हा खर्च सात ते आठ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

-----

म्युकरमायकोसिसच्या उपचारांचा खर्च महात्मा फुले योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. खर्च वाढल्यास तो राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत संबंधित रुग्णालयास मंजूर करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक