शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मिनी बस-टिप्पर धडकेत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 22:33 IST

बिलोली-कासराळी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमतबिलोली/कासराळी (जि़नांदेड),दि. 30 - पुण्याहून तेलंगणाकडे निघालेल्या मिनी बस व वाळू टिप्परच्या धडकेत तीन ठार व नऊ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ५़३० वाजता बिलोली-कासराळी दरम्यान महामार्गवर घडली़ मयतासह सर्व जखमी एकाच कुटुंबातील असून मिनी बस चालकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे़ जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले़ टिप्पर चालक घटनेनंतर फरार झाला आहे़

पुणे येथील स्वारगेट येथे राहणारे कडतन हे कुटुंबीय तेलंगणातील खुदनापूर येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी मिनी बस क्ऱ एम़एच़१२-एच़बी़ १९५७ या वाहनाने निघाले़ कासराळी संपल्यानंतर महावितरण कंपनीच्या ३३ के़व्ही़ विद्युत केंद्राजवळ बिलोलीहून येणाऱ्या वाळूच्या टिप्पर क्ऱ एम़एच़४-एफ़जे़ -८५७६ ची समारोसमोर जोरदार धडक झाली़ या धडकेत दोन सख्ख्या बहिणी व जावा विजयमाला कडतन (वय ५०) व जयश्री कडतन (वय ५५, रा़स्वारगेट, पुणे) जागीच ठार झाल्या़ तर त्यांचा नातू सार्थक मगजी कडतन (वय ११) हा नांदेडला उपचारासाठी नेत असताना मृत पावला़ हा अपघात इतका भीषण होता की टिप्परच्या धडकेने मिनी बसच्या डाव्या बाजूकडील संपूर्ण बाजू कापल्या गेली़ यामध्ये या बाजूला बसलेले सर्वच जण जखमी झाले़ बसचालक विजय पंडित यांची स्थिती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

जखमीमध्ये गंगाराम कडतन (वय ८०), कस्तुरी कडतन (५०), रेखा कडतन (२७), गणपती कडतन (६२), पंकज कडतन (२३), वरद चित्ते (१२), प्रथमेश कडतन (८), किर्ती मगजे (५०) (सर्व रा़स्वारगेट पुणे) यांचा समावेश असून सर्वांना बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ़नागेश लखमावार, डॉ़प्रदीप ठक्करवाड, डॉ़तानाजी लहुटे, परिचारिका कल्पना ठाकूर, जयश्री पाटील, अनू चव्हाण, कालिंदा ढोबळे, सोमेश बिल्डा, दीपक गायकवाड, माधव तुंबरफळे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीउपचार करून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले़ ज्यामध्ये चालक विजय पंडित यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे़ त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदरील घटना दोन्ही चालकाच्या नजरचुकीमुळे व झोपेमुळे झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ अपघातातील टिप्पर हा मांजरा नदीतील नागणी घाटावरून वाळूची वाहतूक करीत होता़ बिलोली पोलिसांनी टिप्पर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ तपास पोलिस उपनिरीक्षक एम़एस़चव्हाण करीत आहेत़ सख्ख्या बहिणी़ जावा अन् शेवटही सोबतचगंगाराम कडतन यांचा संपूर्ण परिवार पुणे येथे राहत असून आपल्या नातवाच्या जावळं कार्यक्रमास तेलंगणातील खुदनापूर देवीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी सकाळी पुण्याहून निघाले होते़ गंगाराम कडतन यांच्या दोन सुना विजयमाला कडतन व जयश्री कडतन या सख्ख्या बहिणी मुळच्या गुलबर्गा येथील असून त्या सख्ख्या जावा आहेत़ हे सर्व कुटुंब पारिवारिक कार्यक्रमासाठी तेलंगणात जात होते़ परंतु नियतीला हे मान्य नसून साखर झोपेतच झालेल्या अपघातात दोन्ही सख्ख्या बहिणींचा घटनास्थळीच अंत झाला़ दरम्यान, कडतन कुटुंबीय मुळचे वसमत (जि़हिंगोली) येथील असून गत अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झाल्याची माहिती मिळाली़