शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने दाखविला मनाचा मोठेपणा

By admin | Updated: March 6, 2016 01:18 IST

स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या बदल्यात मनसेची मदत घेणार, ठाकरे बंधू स्थायी समितीचा अध्यक्ष ठरविणार

पुणे : स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या बदल्यात मनसेची मदत घेणार, ठाकरे बंधू स्थायी समितीचा अध्यक्ष ठरविणार, या सर्व शक्यता फोल ठरवीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांनी आघाडी कायम ठेवीत महापालिकेमध्ये एकीचे दर्शन घडविले आहे. राष्ट्रवादीने एका वर्षासाठीही स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यास नकार दिला असतानाही काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. त्याबदल्यात ३ समित्या व प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद देण्याचा शब्दही पदरात पाडून घेतला.स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब बोडके, काँग्रेसकडून अविनाश बागवे, तर भाजपाकडून राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारांनी अर्ज भरले होते. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेस, मनसे व भाजपाचे प्रत्येकी ३, तर शिवसेनेचे १ असे बलाबल आहे. राष्ट्रवादीला अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा मिळवावाच लागणार होता.राष्ट्रवादीने ४ वर्षे स्थायीचे अध्यक्षपद घेतल्यानंतर किमान एका वर्षासाठी तरी अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळावा, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. राष्ट्रवादीने तसा शब्द दिला असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात होता. तर, दुसरीकडे पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने स्थायीचे अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात होता. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार बनली होती. काँग्रेसच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन यंदा अध्यक्षपदाची संधी काँग्रेसला देण्याची मागणी केली; मात्र त्याला पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाराज झालेली काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपाच्या उमेदवारास मतदान करण्याचा एक पर्याय काँग्र्रेसकडे होता. मात्र, त्यातून राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरही चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे ती शक्यता फेटाळून लावण्यात आली. काँग्रेसने उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढविली असती, तरी राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आला असता. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन ३ समित्या व काही प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची शहणपणाची खेळी काँग्रेसकडून खेळली गेली.