शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपये पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: March 25, 2017 03:34 IST

डिंभे उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पाणीपट्टी थकली आहे. वसुलीसाठी जलसंपदा विभाग फारसा तगादा लावत

अवसरी : डिंभे उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांकडे लाखो रुपये पाणीपट्टी थकली आहे. वसुलीसाठी जलसंपदा विभाग फारसा तगादा लावत नव्हता; परंतु या वेळी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी शाखाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जलसंपदा विभागाच्या कर्मचारी आणि शाखाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.डिंंभे उजवा कालव्याचे पाणी वापरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांकडे पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकल्याने पुढील होणारे उन्हाळी आवर्तन होईल किंवा नाही, याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत वारंवार जलसंपदा विभागाने आवाहन करूनही पाणीपट्टीवसुलीबाबत शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. डिंंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील सुमारे ६८ गावांना कालवा सिंचनाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. खरीप आणि रब्बी हंगामातील सुमारे ३५ हजार एकर क्षेत्र बागायती झाले आहे. पाझर तलाव भरत असल्यामुळे परिसरातील विहिरीची भूजलपातळी वाढली आहे. अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर उजवा कालव्याचे उपलब्ध पाणी झाल्यामुळे बंद झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊनही पाणीपट्टी भरण्याबाबत मात्र उदासीनता जाणवते. अनेकदा जलसंपदा विभाग तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे-पाटील, कालवा सल्लागार समितीचे सदस्य देवदत्त निकम यांनी वारंवार आवाहन करूनही पाणीपट्टी भरण्याबाबत शेतकरी चालढकल करीत आहेत.उपलब्ध होणारी पाणीपट्टी आणि प्रत्यक्षात पाण्याचे होणारे वाटप यांमध्ये मोठी तफावत आहे. आपल्या गावची थकीत पाणीपट्टी असलेल्या खातेदारांची यादी जाहिरात फलकावर डकविण्यात येणार आहे. संबंधित सर्व थकीत खातेदारांनी आपापली पाणीपट्टी बीटधारकाकडे जमा करावी. पाणीपट्टी पावती आपणास ८ दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९ ते ११ या वेळेत मिळेल, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.विविध गावांत होणाऱ्या ग्रामसभेसाठी शाखाधिकारी वि. बा. हाडवळे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. परंतु, पाणीपट्टीबाबत शेतकऱ्यांनी उदासीन न राहता गांभीर्याने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. (वार्ताहर)