शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीने चोरले कोटींचे दागिने

By admin | Updated: May 24, 2015 00:30 IST

प्रसिद्ध उद्योजिका सुलज्जा मोटवानी यांच्या घरामधून ५३ लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी अटक केली आहे.

न्यायालयीन कोठडी : उद्योजिका सुल्लजा मोटवानी यांच्या घरी हिरेजडीत दागिन्यांची चोरी पुणे : प्रसिद्ध उद्योजिका सुलज्जा मोटवानी यांच्या घरामधून ५३ लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून एक नेकलेस, एक अंगठी आणि कर्णफुले जप्त केली असून, त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी सहा लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) प्रकाश मुत्याळ यांनी पत्रकारांना दिली.लक्ष्मी शांती पाल (वय २५, रा. बंगला सी/३ लाईन ५, अभिमानश्री सोसायटी) असे अटक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुलज्जा मनीष फिरोदीया-मोटवानी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मूळची कोलकता येथील राहणारी असून, तिचे शिक्षण पाचवीपर्यंत झालेले आहे. मोटवानी यांनी नातेवाइकाने दिलेल्या संदर्भावरून चार वर्षांपूर्वी तिला नोकरीवर ठेवले होते. तिच्यावर मोटवानी यांचा खूप विश्वास होता. त्यामुळे बंगल्याची देखरेख तिच्यावरच सोपवण्यात आलेली होती. मोटवानी यांनी तिजोरीत ठेवलेल्या हिरेजडीत दागिन्यांबाबत तिच्याकडे १७ मे रोजी चौकशी केली. तेव्हा तिने समाधानकारक उत्तरेदिली नाही. त्यामुळे मोटवानी यांना संशय आला. त्यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या सूचनांनुसार सहायक निरीक्षक विक्रम गौड आणि उपनिरीक्षक तुषार पाचपुते यांनी तपासाला सुरुवात केली. मोटवानी यांच्या घरी पाहणी केल्यानंतर लक्ष्मीकडे कसून तपास करण्यात आला. दरम्यान, लक्ष्मी एक महिन्यापूर्वी कोलकता येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाऊन आल्याची माहिती उपनिरीक्षक पाचपुते यांना मिळाली. त्यानुसार पाचपुते यांनी तिला घेऊन कोलकत्ता गाठले. पोलिसांनी मावस बहिणीच्या घरी जाऊन लग्नाच्या फोटोंचा अल्बम पाहिला. त्यामध्ये असलेल्या लक्ष्मीच्या फोटोमध्ये तिच्या हातात चोरीची अंगठी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मात्र तिने गुन्ह्याची कबुली दिली.ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त धनराज वाळुंजकर, वरिष्ठ निरीक्षक अरुण सावंत, सुभाष निकम, उपनिरीक्षक राजाराम चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाचपुते, प्रभाकर कडू, संजय वाघ, वंदना शिर्के, प्रवीण पाटील, विजय मोरे, श्रीनाथ जाधव यांच्या पथकाने केली.(प्रतिनिधी)४पुण्यात परतल्यावर मोटवानींनी तिला राहण्यासाठी दिलेल्या आऊट हाऊसमधील खोलीची तपासणी केली. या खोलीच्या बाजूला असलेल्या एका अडगळीच्या खोलीमध्ये एका बॅगेत हिरेजडीत हार आणि कर्णफुले, हातातील अंगठी असा ऐवज मिळून आला. यातील अंगठी ३० लाखांची, नेकलेस वीस लाखांचा, तर कर्णफुले तीन लाखांची असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही किंमत दागिने खरेदी केले त्या वेळची असल्यामुळे बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत एक कोटी ६ लाख रुपये होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.