शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

औषधखरेदीत कोट्यवधीचा घोटाळा

By admin | Updated: July 1, 2017 08:00 IST

खुल्या बाजारात ६० ते ९० टक्के सवलत मिळत असताना महापालिकेला फक्त १९.१० टक्के सवलत देऊन कोट्यवधीची औषधखरेदी गेली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खुल्या बाजारात ६० ते ९० टक्के सवलत मिळत असताना महापालिकेला फक्त १९.१० टक्के सवलत देऊन कोट्यवधीची औषधखरेदी गेली अनेक वर्षे केली जात आहे. यात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असून यापूर्वीच्या सर्व खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली. या वर्षीच्या औषध खरेदीत निविदेत दुरुस्ती करण्याचे आश्वासन कुणाल कुमार यांना त्यांना दिले.मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की जेनेरिक औषधे ही नेहमी स्वस्त दरात विकली जातात. तीच औषधे घ्यावीत, असे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक केले आहे. ही औषधेच गेली अनेक वर्षे महापालिकेकडून दिली जात आहेत. त्या औषधांच्या खरेदीवर खुल्या बाजारात थेट ६० टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. असे असताना महापालिका मात्र तीच औषधे फक्त १९.१० टक्के सवलतीच्या दरात खरेदी करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.मंचाच्या वतीने खुल्या बाजारातून खरेदी केलेली औषधे व महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेकेदारांकडून स्वीकारलेली तीच औषधे यांच्या किमतीतीत तफावतीचा तक्ताच वेलणकर यांनी आयुक्तांना सादर केला. दर वर्षी महापालिका किमान पाच कोटी रुपयांची औषध खरेदी करते. खुल्या बाजारात मिळणारी सवलत लक्षात घेता, हीच खरेदी केवळ अडीच कोटी रुपयांमध्ये होऊ शकते. यावरून गेली अनेक वर्षे महापालिकेला कसा गंडा घातला जात आहे, हे लक्षात येते. या सर्व प्रकरणात ठेकेदार, आरोग्य विभागातील अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.निविदा जाहीर करतानाच त्यात जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषधे असे दोन स्वतंत्र विभाग असावेत, अशी सूचनाही आयुक्तांना मंचाने केली. त्याला मान्यता देऊन त्यांनी आरोग्य विभागाला तत्काळ त्याबाबत कळविले. नुकतेच महापालिकेने ५ कोटी रुपयांची औषधखरेदीची निविदा जाहीर केली आहे. त्यात ही दुरुस्ती करण्याचे किंवा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती वेलणकर यांनी दिली.