शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खासगी संस्था देईनात वाढीव दराने दूध

By admin | Updated: July 8, 2017 02:06 IST

गेल्या महिन्यात शासनाच्या विरोधात शेतकरी उतरल्यानंतर शासनाने कर्जमाफीनंतर दूधदर वाढीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शासनाने

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : गेल्या महिन्यात शासनाच्या विरोधात शेतकरी उतरल्यानंतर शासनाने कर्जमाफीनंतर दूधदर वाढीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शासनाने दूधदर २४ रुपयांवरून २७ रुपये केला आहे. परंतु, खासगी दूध संस्थांनी तोच दूधदर २७ रुपयांवरून २४ केला आहे. यामुळे शासनाच्या आदेशाला खासगी दूध संस्थांनी केराची टोपली दाखवली आहे.शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला, तसेच याबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूधव्यवसाय करीत असल्याने दुधाला दर मिळावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे शासनाने गाईच्या दुधाचा दर २४ रुपयांवरून २७ केला आहे. परंतु इंदापूर तालुक्यात खाजगी दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. या भागातील खासगी संस्थांनी दुधाचा दर २७ रुपयांवरून २४ केला असल्याने एकीकडे शासनाचा आदेश असतानाही खासगी दूध संस्था मनमानी करत असल्याचे चित्रसध्या इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तरी शासनाने या खासगी दूध संस्थांवर निर्बंध लादावेत, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.सततच्या कमी होत असलेल्या पावसाच्या प्रमाणामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत असताना शेतकरी जनावरांना ओला चारा मिळवण्यासाठी सतत धडपडत आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने ओला चारा मिळणे अडचणीचे झाले आहे. जिथे ओला चारा मिळतोय तोही शेतकऱ्यांना चढ्या दराने घ्यावा लागत असल्याने दूधदर व खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने या भागातील पशुधन धोक्यात येते की काय, असा प्रश्न भेडसावत आहे. दूध धंदा तरीही तोट्यातच दुधाचा दर २७ रुपये असतानादेखील शेतकऱ्यांचा दूधधंदा तोट्यात आहे. तोच दूधदर खासगी दूध संस्थांनी २७ रुपयांवरून कमी करून २४ रुपये केला असल्याने दूधधंदा कसा करायचा, असा प्रश्न सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.