लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या जुन्या इमारतीमधील मिळकत कर, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग कात्रज पीएमटी डेपोलगत असलेल्या नूतन इमारतीत स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. यासंदर्भात नगरसेवक युवराज बेलदरे यांनी अतिरिक्त आयुक्त यांना पत्र देऊन हे विभाग दोन्ही ठिकाणी सुरू ठेवावेत, अशी मागणी केली आहे. याविषयी बोलताना बेलदरे यांनी सांगितले, की करवसुलीसाठी महापालिका अनेक योजना राबविते, जाहिरात करते, विविध ठिकाणी केंद्रे स्थापन करते, मात्र धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कारभार जरा वेगळाच चाललेला दिसतो. अधिकाऱ्यांना जशी सोय होईल त्या पद्धतीने येथील कामकाज सुरू ठेवण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे. मात्र नागरिकांच्या सोयीकडे प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच हे अधिकारी या ठिकाणी कामास आहेत, हे त्यांनी विसरू नये.
कार्यालयाच्या स्थलांतराचा घाट
By admin | Updated: June 10, 2017 02:15 IST