शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीकडूनही होणार पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 05:48 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाणीकपात केली आहे.

चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाणीकपात केली आहे. या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी व रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. एमआयडीसी अंतर्गत पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, तळवडे, चाकण या भागात पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थिती पाहून जलसंपदा विभागाने पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक गुरुवारसाठी बुधवारी रात्री बारापासून गुरुवारी रात्री बारापर्यंत आणि रविवारसाठी म्हणजे शनिवारी रात्री बारापासून रविवारी रात्री बारापर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. असा आठवड्यातील एकूण दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी सर्वांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३ तारखेपासून शहरात पाणीकपात केली असून, दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. त्यातच एमआयडीसीनेही औद्योगिक परिसरात पाणीकपात करण्याचे जाहीर केले आहे.