शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी भूखंड दरात वाढ

By admin | Updated: March 22, 2016 01:27 IST

एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे.

भोसरी : एकीकडे उद्योजकांना चालना देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्ष उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम एमआयडीसीकडून केले जात आहे. मुदतीत अर्ज करूनही उद्योजकांना भूखंड दिले जात नाहीत. भूखंडाचे दर भरमसाट वाढविले आहेत. जमीन हस्तांतरण शुल्कात वाढ केली आहे. विजेचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे उद्योगांची कोंडी झाली आहे. एमआयडीसीने भूखंडाच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जानेवारीत घेतला आहे. मंदीच्या काळात या दरवाढीमुळे या किमती परवडत नसल्याने गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक लांबणीवर टाकत आहेत. जमीन हस्तांतरण शुल्कात वाढ केल्याने उद्योजकांची आर्थिक लूट केली जात आहे. एमआयडीसीच्या नियमानुसार परिसरातील लघुउद्योजकांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे उद्योगवाढीसाठी मर्यादा पडतात. उद्योगांना चालना देण्यासाठी ही तरतूद २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी प्रलंबित आहे. एमआयडीसी व महापालिकेतर्फे विविध सुविधा पुरविण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. परिसराचा औद्योगिक टाऊनशिप जाहीर करण्याची मागणी दुर्लक्षित आहे. एमआयडीसीने पाण्याचा दर प्रति हजार लिटरला २८.५० इतका अधिक आहे. हा दर अन्याय्य आहे. या भागातील जलवाहिन्या गंजल्या आहेत. भूमिगत गटार योजना करण्याबाबत एमआयडीसीकडून महापालिकेला सूचित केले जात नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हस्तांतरण झाल्याचे सांगत एमआयडीसी हात झटकून मोकळी होत आहे. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक परिसरात झोपडपट्ट्यांचा विळखा वाढतच आहे. त्यामुळे परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. भंगार दुकाने बोकाळली आहेत. याचा त्रास उद्योगांना होत आहे. परिसरातील विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर ४० वर्षांपेक्षा जुने आहे. त्यामुळे वारंवार फॉल्ट होऊन वीज खंडित होते. जुनी यंत्रणा असल्याने फॉल्ट शोधण्यात किमान ५ ते ६ तासांचा वेळ जातो. या काळात विजेअभावी उद्योग बंद ठेवावे लागतात. परिणामी, नुकसान होते. या प्रकारामुळे विशेषत: मध्यम व लघु उद्योजक वैतागले आहेत. (वार्ताहर)