शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील म्हाडा वसाहती विकसित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:53 IST

येरवडा येथील म्हाडा वसाहतीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत आमदार जगदीश मुळीक यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता

चंदननगर : येरवडा येथील म्हाडा वसाहतीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत आमदार जगदीश मुळीक यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथील त्यांच्या दालनामध्ये म्हाडाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती.आमदार जगदीश मुळीक यांनी वाढीव ४ एफएसआय मिळावा, अशी मागणी केली व वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती व नागरिकांना भेडसावणारे मूलभूत विविध प्रश्न व समस्या मांडल्या; तसेच म्हाडाच्या वसाहती जुन्या असून, त्यांचा लवकरच पुनर्विकास करण्याचा निर्णय घ्यावा व यामध्ये सोसायटी बनविण्यासाठी काही नियम शिथिल करून बाधित कुटुंबाला योग्य मोबदला देण्यात यावा. आमदार मुळीक यांनी मंत्री महोदयांशी चर्चा केली.मंत्री महोदयांनी स्थानिक कार्यकर्ते व नगरसेवक यांनी मांडलेल्या सूचना व समस्या समजून घेऊन पुणे क्षेत्रीय अधिकारी यांना याबाबत समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आदेश देण्यात आले.याप्रसंगी म्हाडा पुणे मंडळाचे उपकार्यकारी अधिकारी, अजय सावंत, ज्ञानेश्वर बाबर, अर्चना कुचेकर, नामदेव घाडगे, राजूशेठ बाफना, राजकुमार खोपकर, दिलीप म्हस्के, रामचंद्र देशमुख, बाबलू वैष्णव, नितीन कुचेकर, सुनील गायकवाड, नीलेश जठार, नितीन गुंजाळ, विलास भोसले, आत्माराम टेमकर, गजानन झागडे, संध्या शिंदे, निरंजन मराठे, शाहरुख शेख या बैठकीला उपस्थित होते.