शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची मेट्रो रखडणार

By admin | Updated: December 2, 2014 23:51 IST

मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या पुणे मेट्रोला पुन्हा रेड सिग्नल मिळण्याची शक्यता निर्माण झाली

पुणे : मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या पुणे मेट्रोला पुन्हा रेड सिग्नल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील मेट्रो भूमिगत असावी की जमिनीवरून यावरून दोन प्रवाह निर्माण झाल्याने या दोन्ही बाजू दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) ने ऐकून घ्याव्यात आणि त्यांच्यापुढेही मेट्रोचे सादरीकरण करावे, असा निर्णय दिल्ली येथे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोसाठीच्या सर्व बाबींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता या शेवटच्या दोन टप्प्यावर आलेली मेट्रोची मान्यता आणखी लांबणार आहे. दोन वर्षांपासून मंजुरीसाठी रखडलेल्या मेट्रो प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीतील संसद भवनात बैठक बोलाविली होती. खासदार अनिल शिरोळे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, रजनी पाटील, श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह, केंद्रीय नगरविकास विभागाचे व डीएमआरसीचे अधिकारी उपस्थितबैठकीत प्रकल्पाबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. पुण्यातील मेट्रो प्रकल्प हा काही भागात भुयारी तर काही भागात जमिनीवरील असा असणार आहे. मात्र भुयारी मेट्रो राबविण्याची मागणी काही स्वयंसेवी संस्थांनी लावून धरल्यामुळे मेट्रो प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण या स्वयंसेवी संस्थांपुढे करावे, त्यांची बाजू जाणून घ्या, अशा सूचना जावडेकर यांनी डीएमआरसीला केल्या.तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात बैठक घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे ही पुण्यातील बैठक झाल्याशिवाय मेट्रोचे पीआयबी समोरील सादरीकरण होण्याची सूतरामही शक्यता नसल्याने मेट्रोची मान्यताही लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)