शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा बोगदा पोहचला बुधवार पेठ स्थानकापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कृषी महाविद्यालयाकडून येणारा मेट्रोचा पहिला बोगदा गुरुवारी मेट्रोच्या नियोजित बुधवारपेठ भुयारी स्थानकापर्यंत पोहचला. याच मार्गावरचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कृषी महाविद्यालयाकडून येणारा मेट्रोचा पहिला बोगदा गुरुवारी मेट्रोच्या नियोजित बुधवारपेठ भुयारी स्थानकापर्यंत पोहचला. याच मार्गावरचा दुसरा बोगदाही लवकरच या ठिकाणापर्यंत पोहचेल. स्वारगेटकडून येणारा बोगदा मंडईत येणार आहे.

मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग पूर्ण भुयारी आहे. शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके या मार्गात आहेत. कृषी महाविद्यालयाच्या बाजूने दोन व स्वारगेकडून दोन या पद्धतीने मेट्रोच्या या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. अत्याधुनिक टीबीएम (टनेल बोअरिंग मशिन) यंत्राद्वारे हे खोदकाम सुरू आहे. खोदकाम होत असतानाच या यंत्राद्वारे खोदलेल्या भागाला आतील बाजूने सिमेंटच्या प्लेट बसून एक ट्यूब तयार होते. कृषी महाविद्यालयाकडून बुधवार पेठेतील नियोजित स्थानकापर्यंत अशी एक ट्यूब आता तयार झाली.

स्वारगेटकडून सुरू झालेले बोगद्याचे काम आता लवकरच मंडईपर्यंत पोहचेल. बुधवार पेठेतून आता खोदकाम सुरू होऊन ते मंडईपर्यंत येईल. मंडईतील नियोजित भुयारी स्थानकात हे चारही बोगदे एकत्र झाले की शिवाजीनगर ते स्वारगेट असा एक सलग भुयारी मार्ग तयार ह़ोईल. त्यातील ५ भुयारी स्थानकांचे कामही सध्या सुरू आहे.

नदीखालून भुयारी मार्गाने मेट्रो जाणारे पुणे हे भारतातील चौथे शहर झाले आहे. याआधी मुंबई (मिठी नदी), कलकत्ता (हुगळी नदी), आणि चेन्नई (कुम आणि अद्यार) या महानगरांमध्ये टनेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा बनविण्यात आला आहे.

मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे ३३ मीटर खोल आहे. नदी पात्राच्या तळापासून तो १० मीटर खोलीवरून जात आहे. टीबीएम बुधवारपेठेपर्यंत आल्याने मेट्रोच्या कामाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाला. महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यावेळी उपस्थित होते.

फोटो - मेट्रो