शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्थानकांचे कामही लवकरच सुरू

By admin | Updated: May 11, 2017 04:54 IST

बहुचर्चित पुणे मेट्रोच्या ‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स कॉर्नर’ या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या कामाच्या निविदेनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बहुचर्चित पुणे मेट्रोच्या ‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स कॉर्नर’ या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या कामाच्या निविदेनंतर आता लगेचच याच मार्गावरील ९ स्टेशनच्या कामाची निविदाही येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध होत आहे. मेट्रोच्या उन्नत (इलेव्हिटेड-रस्त्याच्या वरून जाणाऱ्या) मार्गावरील ही सर्व स्टेशनही मार्गाला जोडूनच म्हणजे उन्नतच असतील.या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गावर एकूण ९ स्टेशन असणार आहेत. प्रत्येक स्टेशनचा विस्तार १४० मीटर गुणिले ४० मीटर इतका असेल. हे स्टेशन मेट्रो मार्गाला जोडूनच असेल. सुरुवात जिथून होणार आहे ते पीसीएमसी स्टेशन व त्यानंतर तुकाराम नगर, भोसरी (नाशिक फाटा) कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी व रेंजहिल अशी ९ स्टेशन असणार आहेत. या १० स्टेशनच्या कामाची एकच निविदा असेल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली. येत्या दोनच दिवसांत निविदा प्रसिद्ध होईल. त्यानंतर मुदतीत आलेल्या कंपनीच्या निविदांपैकी पात्र निविदा मंजूर करून लवकरच याही कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.सर्व स्टेशन उन्नत असणार असून, जमिनीपासून ते साधारण २० ते २२ मीटर उंचीवर असतील. ती तीन स्तरांत विभागलेले असेल. पहिल्या स्तरावर मेट्रोमधून उतरता येईल. त्यानंतर लगेच त्याच्या खालील मजल्यावर प्रवेश होईल. तिथे कॅफेटेरिया असेल. या जागेतून थेट खाली म्हणजे रस्त्यावर येता येईल. ही सर्व स्टेशन अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येणार आहेत. एका स्टेशनचा बांधकामाचा खर्च साधारण ४० ते ४५ कोटी रुपयांपर्यंत असेल. त्यासाठीच्या जागापैकी बहुतेक जागा सरकारी मालकीच्या आहेत. त्या मिळण्यात काहीच अडचण नाही. जिथे अडचण आहे त्याठिकाणी संबधितांशी चर्चा करण्यासाठी महामेट्रोने एक समिती स्थापन केली असून, ही समिती त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढेल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.दीक्षित यांनी सांगितले की, स्टेशनवर चढण्या-उतरण्यासाठी सरकते जिने असतील. त्यामुळे कोणालाही उंचीचा त्रास होणार नाही. स्टेशनवरून उतरलेल्या प्रवाशांना लगेचच रिक्षा, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या बस यांची कनेक्टीव्हिटी मिळेल. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेशनच्या जवळ वाहनतळ असेल. महापालिकेबरोबर बोलून त्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोजवळ येताना किंवा मेट्रोपासून लांब जाताना प्रवाशांना काहीही त्रास होणार नाही. याशिवाय मेट्रो, बस यासाठी एकच कॉमन कार्ड चालेल. प्रवाशांना प्रत्येक वेळी तिकीट काढण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही. स्टेशनच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कंपनीला काम देईपर्यंत थोडा वेळ लागले. त्यानंतर मात्र तेही काम संबंधित ठेकेदार कंपनीला त्वरित सुरू करण्यास सांगण्यात येणार आहे. या कामाचा नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे; मात्र तो कमीतकमी होईल याची काळजी मेट्रो कंपनी घेणार आहे, असे दीक्षित यांनी सांगितले. नागरिकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.