शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

दुभाजकामधून धावणार मेट्रो

By admin | Updated: April 16, 2017 04:02 IST

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रोमार्ग करण्यात येणार आहे. हा मेट्रोमार्ग करताना दापोडी ते पिंपरीदरम्यान पुणे - मुंबई महामार्गावरील रस्ता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रोमार्ग करण्यात येणार आहे. हा मेट्रोमार्ग करताना दापोडी ते पिंपरीदरम्यान पुणे - मुंबई महामार्गावरील रस्ता दुभाजकामधून मेट्रो धावणार आहे. महापालिकेने केलेल्या फेरआखणीत हा मार्ग सुचविण्यात आला असून, महामेट्रो कॉर्पोरेशननेही या मार्गाला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या स्वायत्त कंपनीमार्फ त स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग करण्यात येणार आहे. या नियोजनानुसार, मेट्रो मार्ग हा पिंपरी ते दापोडी हॅरिस पूल असा पदपथाच्या कडेने नियोजित केला होता. या कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करण्यापूर्वी मार्गाची अंतिम आखणी पदपथालगत करण्याची मागणी पुणे मेट्रोने महापालिकेकडे २७ जानेवारीला केली होती. तसेच त्याचे सादरीकरणही केले होते. बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता यांनी पिंपरी ते दापोडी रस्ता विकसित करताना केलेल्या कामाच्या तांत्रिक बाबींचा विचार करून पुणे मेट्रोने मागणी केलेल्या आखणीस असहमती दर्शविली. तसेच तांत्रिक कारणे नमूद करून पुणे मेट्रोचा मार्ग निगडी- दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून आखणी करण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार, बीआरटीएसचे सह शहर अभियंता यांनी महामेट्रोचे कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीत पदपथाच्याकडेने मेट्रोचे काम केल्यास काही त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये अस्तित्वातील पदपथांखालील सर्व सेवावाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार. सेवा रस्त्यांची रुंदी ९ मीटरवरून ४.७५ मीटर इतकी कमी होणार आहे. वारंवार वाहतूककोंडीची दाट शक्यता आहे. प्रत्येक मेट्रो स्टेशनसाठी ५ ते ७ मीटर रुंद व १४० मीटर लांब क्षेत्राच्या भूसंपादनाची आवश्यकता लागणार. कालावधीचा विचार करता प्रकल्पाला उशीर होणार. याशिवाय सुमारे ६५० झाडे काढावी लागणार आहेत. या त्रुटींचा विचार करून एक्सप्रेस लेन व बीआरटीएस लेनच्या मधील २ मीटर रुंद दुभाजकामधून मेट्रो मागार्ची आखणी करून बीआरटीएसचे सह शहर अभियंता यांनी १५ व १७ मार्च रोजी महापालिका आयुक्त व पदाधिकाऱ्यांना या मार्गाचे सादरीकरण केले होते. (प्रतिनिधी)वाहतूक नियोजन सोपे निगडी- दापोडी रस्त्यावर बीआरटी, मेट्रो, लोकल या वाहतुकीच्या तीनही पर्यायांमुळे एकात्मिक वाहतूक नियोजन करणे सोपे होणार आहे. याशिवाय पदपथामधील सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याची गरज राहणार नाही. बीआरटीएस लेन, सेवा रस्ते अखंडित राहतील. वाहतूककोंडी कमी होईल. झाडेही कमीत कमी काढावी लागणार आणि भूसंपादनाची गरज नसल्याने प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण होणार. अशी असतील मेट्रो स्टेशन पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी (फोर्ब्ज मार्शल) फुगेवाडी (जकात नाका), दापोडी (अरुण टॉकीज).