शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो, २४ तास पाण्यासाठी जायका कंपनीकडून कर्ज

By admin | Updated: January 19, 2016 01:56 IST

शहरातील १२ हजार कोटींचा बहुचर्चित मेट्रो प्रकल्प व ३ हजार कोटी रुपयांचा २४ तास पाणीपुरवठा योजना यासाठी अल्प दराने दिर्घ मुदतीचे कर्ज देण्यास जपानच्या जायका

पुणे : शहरातील १२ हजार कोटींचा बहुचर्चित मेट्रो प्रकल्प व ३ हजार कोटी रुपयांचा २४ तास पाणीपुरवठा योजना यासाठी अल्प दराने दिर्घ मुदतीचे कर्ज देण्यास जपानच्या जायका कंपनीने तयारी दर्शविली आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सल्लामसलतीने पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी दिली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे मुख्य अधिकारी महेश झगडे, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांचा आजपासून जपान दौरा सुरू झाला आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जायका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या वेळी प्रस्तावित मेट्रो प्रकल्प, २४ तास पाणी योजना, सायकल योजना, नदीसुधार योजना, एचसीएमटीआर, ऊर्जा प्रकल्प यांचे सादरीकरण अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले.पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात वनाझ कंपनी ते रामवाडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रकल्प केंद्र शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील ५० टक्के रक्कम केंद्र, राज्य व महापालिकेच्या यांच्या संयुक्त निधीतून उभारली जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कर्जातून उभारावी लागणार आहे. त्याकरिता जायका कंपनीने ०.३ टक्के दराने ४० वर्ष कालावधीसाठी कर्ज देण्यास तयार दर्शविली आहे. २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी ३ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. त्याकरिताही कर्ज देण्यास जायकाने सहमती दर्शविली आहे.जायका कंपनीच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्याला भेट देणार आहे. या भेटीत कर्जाविषयी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाईल, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. महेश झगडे यांनी पीएमआरडीएच्या नियोजित प्रकल्पांची माहिती दिली. त्याकरिता जायका कंपनीने सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जायका कंपनीकडून शहरातील महत्त्वपूर्ण अशा नदीसुधार प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. त्याबाबातचा करार नुकताच केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत झाला आहे. त्यानुसार येत्या ३ महिन्यांत याची टेंडर प्रक्रिया निघणार आहे. जायका कंपनीने हे कर्ज केंद्र शासनाला दिले असून महापालिकेला त्याची परतफेड करावी लागणार नाही.