शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-‘एचसीएमटीआर’ ‘पीएमआरडीए’मध्ये नको

By admin | Updated: May 30, 2015 01:00 IST

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करण्यास पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विरोध केला.

पुणे : बहुचर्चित मेट्रो प्रकल्प व शहरा- अंतर्गत रिंगरोड (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड) या दोन्ही प्रकल्पांचा समावेश पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करण्यास पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विरोध केला. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या सदस्यांची दुसरी बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पीएमआरडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.मेट्रो व ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पांचा समावेश ‘पीएमआरडीए’मध्ये करण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. त्या वेळी दोन्ही महापालिकांच्या महापौरांनी प्रकल्पांचा समावेश व अधिकार पीएमआरडीएला देण्यास विरोध दर्शविला. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा स्वारगेट ते चिंचवड या मेट्रो मार्गाचा प्रकल्प राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ‘पीआयबी’ व अर्थ समितीकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव आहे. तसेच, वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी प्रलंबित आहे. मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. तसेच, एससीएमटीआरची भूंसपादन प्रक्रिया महापालिकेकडून वेगाने सुरू आहे. त्यामुळे ऐनवेळी मेट्रो व एचसीएमटीआरचा समावेश पुणे महानगर प्राधिकरणात करण्यात येऊ नये, अशी भूमिका महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बैठकीत मांडली. त्यामुळे मेट्रोचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. (प्रतिनिधी)मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी ‘एसपीव्ही’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ऐनवेळी कंपनीचे अधिकार पीएमआरडीएला देणे अडचणीचे व प्रकल्पासाठी दिरंगाईचे ठरणार आहे. मात्र, एसपीव्हीमध्ये पीएमआरडीएला प्रतिनिधित्व देण्यास आमची हरकत नाही. -दत्तात्रय धनकवडे, महापौर.