शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिग’ चा मेसेज आलाय? सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तुमचे अद्याप व्हेरिफिकेशन झालेले नाही, ते तातडीने करायचे आहे़ तुम्ही तत्काळ विचारलेली माहिती द्या, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तुमचे अद्याप व्हेरिफिकेशन झालेले नाही, ते तातडीने करायचे आहे़ तुम्ही तत्काळ विचारलेली माहिती द्या, अन्यथा तुमचे सिमकार्ड २४ तासांत ब्लॉक होईल, असा तुम्हाला अचानक फोन किंवा मेसेज येऊ शकतो. हा फोन किंवा मेसेज म्हणजे तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याची सायबर चोरट्यांनी केलेली तयारी होय. त्यामुळे सावधान आणि अशा फोन, मेसेजकडे दुर्लक्ष करा.

सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे आणून लोकांना फसवित असल्याचे दिसून आले आहे. आधी लॉटरी लागल्याचे, परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे, नोकरीचे आमिष दाखविणारे फोन करून संबंधितांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार सायबर चोरटे करत असतात.

तुम्हाला कोणत्याही मोबाइल कंपनीकडून बोलतो, असे सांगणारा फोन अथवा मेसेज आला आणि त्याने तुमचे व्हेरिफिकेशन पेडिंग आहे, असे सांगून तुमचे सिमकार्ड ब्लॉक होईल, असा धाक दाखविला तर घाबरून जाऊ नका. फोन करणाऱ्याला किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. त्याने पाठविलेली कोणतीही लिंक अथवा अ‍ॅप डाऊनलोड करू नका. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही.

तब्बल १५ हजार तक्रारी

सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या कारणावरून फसविल्याच्या तब्बल १४ हजार ९५० तक्रारी गेल्या वर्षी २०२० मध्ये सायबर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. या वर्षी ३१ मेपर्यंत पाच महिन्यात तब्बल ७ हजार २० तक्रारी आल्या आहेत. त्यात सिमकार्ड ब्लॉक होईल, असे सांगून फसवणूक झाल्याच्या ११ तक्रारी आहेत.

कोणतीही बँक अथवा मोबाईल कंपनीतील अधिकारी, कर्मचारी कधीही फोन करत नाही. कंपनीकडून असे अ‍ॅप डाऊनलोड करण्याविषयी सांगितले जात नाही. हे कायम लक्षात ठेवा. छोटीशी सतर्कता बाळगली तर आपण सायबर चोरट्यांना दूर ठेवू शकतो.

सुरक्षा आपल्या हातात

ज्याप्रमाणे मोबाईल आपल्या हातात असतो. त्याचप्रमाणे सायबर चोरट्यांपासून आपली सुरक्षा करणे हेही आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्तीला आपली व्यक्तिगत माहिती देऊ नका. कोणतीही लिंक डाऊनलोड करण्यापूर्वी आपण फसविले जाणार नाही ना, याची खात्री करा.

दगडू हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.

.........