शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहसंमेलनातून दिला ‘पाणी वाचवा’चा संदेश

By admin | Updated: March 30, 2017 00:00 IST

शितोळेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलनात (जल्लोष २०१७) शिवराज्यभिषेक, पाणी वाचवा तसेच दुष्काळ, इंग्रजी नाटके, मराठी

राजेगाव : शितोळेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलनात (जल्लोष २०१७) शिवराज्यभिषेक, पाणी वाचवा तसेच दुष्काळ, इंग्रजी नाटके, मराठी लावण्या, लोकगीते महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा गीत इत्यादी कलाविष्कार सादर करण्यात आले.खडकी परिसरातील शितोळेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन (जल्लोष २०१७) उत्साहात पार पडले. पालकांचा व पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. शाळेच्या पटांगणामधे यात्रेला जमावी तशी गर्दी दिसत होती. मुलांवर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव करताना नकळत प्रेक्षक मुलांबरोबर ठेका धरताना दिसत होते. मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. संध्याकाळी ७.३० ते रात्री १२ पर्यंत एकही जण जागेवरून उठला नाही.पंचायत समितीच्या सभापती मीनाताई धायगुडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, सहायक विक्रीकर आयुक्त दत्तात्रय भिसे, गटशिक्षणाधिकारी गौतम बेलखेडे, सरपंच मंगेश शितोळे, उपसरपंच जावेद पठाण, सदस्या मीरा काळे, व्हाईस चेअरमन संतोष मचाले, नीलेश शितोळे, प्रशांत काळे, सूर्यकांत शितोळे, गोविंद शितोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदयसिंग शितोळे, उपाध्यक्ष समीर शितोळे सर्व सदस्य उपस्थित राहून पाठीवर कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेवर काम करून विद्यार्थी घडविण्याच्या कामात आणि एकूणच गावाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावलेल्या शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष मंगेश शितोळे, माजी उपाध्यक्ष संतोष शितोळे, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी केलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, शिक्षकांनाही कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्ञानेश्वर भापकर, सोमनाथ पांढरे, किरण जांबले, संगीता गोंडगे यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. शाळेतून बदली होऊन गेलेले राजाराम सोनवणे, ज्ञानदेव काळे, अप्पासाहेब भोरे, पांडुरंग खाटमोडे, दीपक कदम, सचिन वालतुरे, राणी कोतवाल उपस्थित राहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असलेली आपुलकीची भावना आणि डोळ्यांतून आमच्यावर होणारा शुभेच्छांचा वर्षाव आम्ही याचि देही याचि डोळा अनुभवू शकलो.