पुणे : धनकवडी येथील स्वामी समर्थ सोसायटीमध्ये लोकसहभागातून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या वारकरांची दिंडीचे स्वागत व विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यावेळी समाजाला स्त्री-भ्रूण हत्या थांबवा व बेटी बचावचा संदेश देण्यात आला. वारकरी दिंडीचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्याऐवजी स्वामी समर्थ सोसायटीतील सभासदांनी बेटी बचावचा संदेश देणारे फलक लावून समाजात जनजागृतीचा प्रयत्न केला. गितांजली झेंडे यांच्या किर्तन शुक्रवारी झाले.नगरसेविका वर्षा तापकीर व संतोष ढमाले यांनी दिंडी प्रमुखांचे स्वागत केले. वारकरी यांच्यासाठी अन्नदानाचा कार्यक्रम शनिवारी झाला. त्यानंतर महाराज प्रसाद कापसे यांचे भारूड झाले.सोसायटीतर्फे जितेंद्र चव्हाण, सतीश टिळेकर, रविंद्र पाटील, विजू कदम, अरुण मुंडलीक, संदीप पंडित, अशोक शिंदे व सतीश कोट्टमवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (प्रतिनिधी)
वारकरी दिंडीतून ‘बेटी बचाव’चा संदेश
By admin | Updated: July 13, 2015 03:42 IST