शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याने घातला शेतकऱ्यांना गंडा

By admin | Updated: April 22, 2017 03:36 IST

निमगाव केतकी (ता. इंदापूर) गावामध्ये परराज्यातील बहुसंख्य व्यापारी येऊन परिसरातील गावातील तालुक्यातील शेतमाल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सौदा करून

निमगाव केतकी : निमगाव केतकी (ता. इंदापूर) गावामध्ये परराज्यातील बहुसंख्य व्यापारी येऊन परिसरातील गावातील तालुक्यातील शेतमाल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सौदा करून विकत घेतात. या व्यापाऱ्यांकडून हा सर्व माल चढ्या भावाने विकत घेणारा मोठा व्यापारीच त्याचे पैसे घेऊन मागील आठवड्यात फरार झाला आहे़झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील फुलवडिया (तालुका राजमहल) गावातील समसुलभाई शेख (वय ५५) व्यापारी त्यांच्या राज्यासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातील ४२ व्यापाऱ्यांचे तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम घेऊन गायब झाला. इंदापूर तालुक्यातील बहुतांशी गावात डाळिंबाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. या शेतकऱ्यांचा माल थेट बांधावर जाऊन बरेच लहानसहान व्यापारी दलाल मालाचा दर्जा बघून सौदा करून विकत घेतात. हा विकत घेतलेला माल हा समसुलनामक व्यापारी विकत घेत होता. या व्यापाऱ्याने मागील दोन वर्षांत बाजारामध्ये जम बसविला होता. त्यामुळे त्याच्यावर व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनीही विश्वास ठेवून व्यवहार केले होते़ मात्र, याचा फायदा घेत व्यापाऱ्याने सुमारे एक कोटी रुपयाला फसवून रातोरात मोबाईल बंद करून पोबारा केला़ याच व्यापाऱ्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील व्यापाऱ्यांचा व शेतकऱ्यांची अशीच किमान साठ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. सांगोल्यातील बरेच व्यापारी निमगावात येरझाऱ्या मारत आहेत. गावातील एका शेतकऱ्याला मालाचे दोन लाख रुपये दुपारी देतो, म्हणून गेला आहे तो अद्याप आलाच नाही, असे त्याने सांगितले. गावातील दुकानदार, मोठे कंपनीमालक तसेच डाळिंब पॅकिंगचे बॉक्स आदी साहित्य यांचेही काही लाखांत उधारी करून या व्यापाऱ्याने पळ काढला़ त्यामुळे मुक्तार मुलाणी यांनीही इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून तशा आशयाच्या तक्रारी अनेकांनी देण्यास सुरुवात केल्या आहेत. - आर्थिक फसवणुकीमुळे एरवी गजबजलेली डाळिंब व्यापारपेठ थंडावली आहे. काही शेतकऱ्यांनी मधले दलालांशिवाय डाळिंब विक्री केली़ असे शेतकरी तर कपाळाला हात लावून बसले आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्याही जास्त असण्याची शक्यता आहे.याबाबत फसवणूक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी आम्ही कायदेशीर लढा उभारणार असल्याचे शेतकरी चळवळीचे अ‍ॅड. सचिन राऊत व अ‍ॅड. श्रीकांत करे यांनी सांगितले.