शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप ठरतोय दिलासादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST

पर्यावरणपूरक पर्याय : सोशल मिडियावर जनजागृती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मासिक पाळीतील त्रास हा अजूनही कुजबुजत बोलण्याचा विषय... ...

पर्यावरणपूरक पर्याय : सोशल मिडियावर जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मासिक पाळीतील त्रास हा अजूनही कुजबुजत बोलण्याचा विषय... मग सॅनिटरी पॅड वापरावेत, टॅम्पॉन वापरावेत की, मेन्स्ट्रुअल कप वापरावा, याबाबत आपण खुलेपणाने कधी बोलणार? बहुतांश मुली, तरुणी, महिला या पोटदुखी, अंगदुखी, मानसिक ताण, रक्तस्त्राव, कापड किंवा पॅडमुळे होणारी अ‍ॅलर्जी हा त्रास म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार... यातून सुटका होण्यासाठी मेन्स्ट्रुअल कपसारखे पर्यावरणपूरक पर्याय, ते वापरण्याची पद्धत, याबद्दल जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर याबद्दल किमान खुलेपणाने बोलले जात आहे.

कोणत्याही नवीन वस्तूच्या वापराबाबत असणारा टॅबू, योग्य माहिती नसणे, मार्गदर्शन न मिळणे, यामुळे आजही अनेक जणी मेन्स्ट्रुअल कप वापरायला घाबरतात. मात्र, वारंवार सॅनिटरी पॅड बदलावे लागणे, पॅडच्या कडांमुळे अ‍ॅलर्जी किंवा रॅश उठणे, घराबाहेर वावरताना अडचणी येणे अशा अनेक त्रासांमुळे कायमची सुटका होऊ शकते, अशा भावना मेन्स्ट्रुअल कप वापरत असलेल्या अनेक महिलांनी व्यक्त केल्या.

‘मी गेली दोन वर्षे मेन्स्ट्रुअल कप वापरत आहे. पोलीस दलात कार्यरत असल्याने, मासिक पाळीमध्ये अनेकदा पॅड बदलण्यासाठी चांगले स्वच्छतागृहही उपलब्ध होत नाही. आमच्या एसआय मॅडमनी मला हा पर्याय सुचविला आणि सुरुवातीला कप आणूनही दिला. कप वापरता येईल की नाही, याबाबत मी खूप घाबरले होते, पण आता सवय झाली आहे. एवढी वर्षे मी पॅड का वापरले, असा आता प्रश्न पडतो,’ असे मत पोलीस हवालदार सुनिता जगताप यांनी व्यक्त केले.

----

गेले २ वर्षे मेन्स्ट्रुअल कपविषयी वाचत होते, युट्यूबवर पाहत होते, पण प्रत्यक्ष वापरण्याचा धीर झाला नाही. यंदा लॉकडाऊनमध्ये आवर्जून कप वापरण्याचे ठरविले. ऑनलाइन मागविलेला मेन्स्ट्रुअल कप पाण्यात उकळून स्टरलाइज करून घेतला आणि पाळी आलेल्या दिवशी युट्यूबवर दाखविल्याप्रमाणे कप घातला. पाळी आल्यावर दिवसभर येणारी अस्वस्थता, रात्री कपडे आणि बेडशीट यांच्यावर डाग पडण्याची भीती, पॅड्स वापरल्याने त्वचेवर उठणारी खाज या सर्व त्रासातून एकदम मुक्ती मिळाल्यासारखे वाटले. माझा स्वानुभव कथन करणारी पोस्ट मी फेसबुकवर शेअर केली. पोस्टला अनपेक्षितपणे उदंड प्रतिसाद मिळतो आहे. अनेक तरुणी, महिलांच्या मनातील भीती कमी व्हायला मदत होते आहे. सकारात्मक बाब अशी की, अनेक पुरुषांनीही आपल्या जोडीदाराशी या विषयावर चर्चा केल्याचे सांगितले.

- नम्रता भिंगार्डे, तरुणी

---

मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव, आपली कामाची पद्धत अशा विविध बाबींचा विचार करून मेन्स्ट्रुअल कपचा आकार ठरवता येईल. कप एका वेळी १०-१२ तास वापरता येऊ शकतो. पाळी येण्याच्या आधी कप घालण्याचा सराव केल्यास ऐन वेळी त्रास होणार नाही. कप एकदा घेतल्यावर किमान पाच-सहा वर्षे वापरता येतो. त्यामुळे सॅनिटरी पॅडच्या तुलनेत हा पर्याय स्वस्त आणि पर्यावरणपूरक ठरतो.

- डॉ.आदिती वस्ते, स्त्रीरोगतज्ज्ञ