शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मारक उजळले दीपोत्सवाने

By admin | Updated: November 11, 2014 00:24 IST

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकावर साठलेली धूळ आणि माती सोमवारी दूर झाली. स्मारकाचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.

पुणो : आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकावर साठलेली धूळ आणि माती सोमवारी दूर झाली. स्मारकाचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. स्मारकाच्या परिसराची स्वच्छता करून सुंदर रांगोळी काढून या ठिकाणी दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ‘लोकमत’ने फडकेंच्या स्मारकाची दुरवस्था उघड केली होती. सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने स्मारकाची स्वच्छता केली. तर सीआयडी व अन्य विभागांचे पोलीस अधिकारी मात्र ढिम्म बसलेले होते. एकानेही स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याचे सौजन्य दाखवले नाही.
वासुदेव बळवंत फडकेंविरुद्ध चाललेल्या राजद्रोहाच्या खटल्याची सीआयडीची वास्तू साक्षीदार आहे. याच वास्तूमधील एका खोलीमध्ये फडकेंना चार महिने डांबण्यात आले होते. कोळी, धनगर आणि रामोशी समाजाच्या तरुणांना घेऊन ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणा:या फडकेंना एडनला हलवेर्पयत ते याच खोलीमध्ये राहिले होते. सीआयडीचे तत्कालीन महासंचालक जयंत उमराणीकर यांनी या घटनेचे महत्त्व ओळखून फडकेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुंदर स्मारक 2006 साली लोकवर्गणीमधून उभे केले होते. परंतु अवघ्या आठच वर्षात या स्मारकाची दैना झाली. जागोजाग कच:याचे ढीग तयार झाले. फडके स्मृती उद्यानाची जागा गुडघाभर वाढलेल्या गवताने घेतली. 
या संपूर्ण स्मारक परिसराची झालेली दुरवस्था ‘लोकमत’ने  मांडली. सीआयडी, लोहमार्ग पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचा:यांनी या स्मारकाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. स्मारकाच्या जतनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता  ‘लोकमत’ने व्यक्त केली होती. या बातमीची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या कार्यकत्र्यानी स्मारकाची स्वच्छता केली. हातामध्ये झाडू घेऊन सगळा परिसर झाडून काढला. तसेच फडकेंच्या अर्धाकृती पुतळ्याची स्वच्छता केली. घुमटाच्या आतील मूत्र्याचीही स्वच्छता केली. दारूच्या बाटल्या उचलण्यात आल्या. पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 
आघाडीचे अध्यक्ष मनीष साळुंके यांच्यासह धनंजय गायकवाड, गोपाळ नायडू, राजू झारखंडे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष काळे, शंकर कुराडे, प्रशांत पवार, संजय वाव्हळ, अशोक शेलार, रामचंद्र मुंडे, संजय जाना, अनिल मुंढे, संदीप जांभळे, जितेंद्र साळुंके, राजू भूमकर, संजय राऊत, संजय कपिले, योगेश व्हावळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  
(प्रतिनिधी)
 
पतित पावन संघटनेने फडके स्मारकावर संध्याकाळी जाऊन काही भागाची स्वच्छता करण्यात आली. स्मारकासाठी विजेची स्वतंत्र व्यवस्था करून तिथे प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी या वेळी संघटनेच्या पदाधिका:यांनी केली. संघटनेच्या कार्यकत्र्यानी स्मारकाच्या भोवती सुंदर रांगोळी काढून दिव्यांची आरास केली. दररोज अंधारात राहणारा फडकेंचा पुतळा दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघाला होता. स्मारकाची जी दुरवस्था झाली आहे त्याचा संघटनेकडून निषेध करण्यात आला. जर स्मारकाची निगा राखण्यात प्रशासन असमर्थ असेल तर त्याची जबाबदारी घेण्यास संघटना तयार असल्याचे निवेदन संघटनेने सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहे. या वेळी शहर सरचिटणीस मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर, गोकुळ शेलार, सुनील तांबट, सीताराम खाडे, स्वप्निल नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.