शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

मेमोची नियमावली ठरवणार

By admin | Updated: July 11, 2016 01:30 IST

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेमो देण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या विभागांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने मेमो दिल्याचे सिद्ध झाले आहे

दीपक जाधव,   पुणेमहापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेमो देण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या विभागांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने मेमो दिल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल महापालिकेतील महिला तक्रार निवारण समितीने घेतली असून महाराष्ट्र महानगर अधिनियमांतर्गत शिस्तभंग प्राधिकाऱ्यांची नेमणूक करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मेमो देण्याबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.महापालिकेतील आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांच्याविरुद्ध एका महिला अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये आरोग्यप्रमुखांकडून अगदी किरकोळ कारणांवरून मेमो देण्यात आला. अगदी आॅफिसमधील फोन उचलला नाही, या कारणावरूनही मेमो दिला गेला. मेमो मिळताच उलट टपाली उत्तर द्या, २४ तासांत मेमोला उत्तर द्या, असे आदेश देण्यात आले. त्यांना एकूण ३४ मेमो देण्यात आले होते. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीने (विशाखा समिती) या प्रकरणाची सखोल चौकशी केली. अनेकांचे जबाब, साक्षी नोंदविण्यात आल्या. या चौकशीमध्ये आरोग्यप्रमुखांना दोषी धरून त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्याची कारवाई समितीने केली आहे. त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मेमो देण्याच्या अधिकाराचा गैरवापर करण्याच्या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे.एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याला सतत मेमो मिळाले, याचा अर्थ त्याचे काम समाधानकारक नसल्याचे त्यातून स्पष्ट होते. त्याच्या सेवापुस्तिकेवर याची नोंद होण्याबरोबरच त्याला निलंबित करण्याची कारवाई मेमोवरून होऊ शकते. महाराष्ट्र महानगर अधिनियमांतर्गत शिस्तभंग प्राधिकारी नेमून त्याच्याकडून नेमक्या कोणत्या चुकीबद्दल मेमो दिला गेला पाहिजे, मेमो देण्यासाठीची सबळ कारणे कोणती, याची निश्चिती केली जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मेमो देऊन अनेकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो. विशेषत: महिला अधिकारी व कर्मचारी याला सातत्याने बळी पडल्याचे आढळून आले आहे. मेमो प्रकरणाची चांगलीच दहशत कर्मचाऱ्यांमध्ये बसली आहे. मेमो देण्याचा हा गैरवापर अधिकाऱ्यांकडून कसा कमी करता येईल, याचा अभ्यास या शिस्तभंग प्राधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. त्यांच्याकडून याबाबतचे नियम निश्चित करून त्याचा अहवाल महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना सादर केला जाईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सातत्याने मेमोचा त्रास सहन करणाऱ्या पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.