शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरम टाळण्यासाठी सभासद बाहेर

By admin | Updated: March 10, 2016 01:24 IST

शहराच्या विकासकामांचे भवितव्य ठरविणाऱ्या अंदाजपत्रकावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या मुख्य सभेचे कामकाज होऊ नये याकरिता काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

पुणे : शहराच्या विकासकामांचे भवितव्य ठरविणाऱ्या अंदाजपत्रकावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या मुख्य सभेचे कामकाज होऊ नये याकरिता काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांना सभागृहातून परत पाठवून कोरमअभावी सभेचे कामकाज बंद पाडण्यास भाग पाडले. सभागृहाच्या संकेतांना पायदळी तुडवीत नैतिकतेला हरताळ फासला गेल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. सभा सुरू झाली तेव्हा सभागृहात महापौर व तीनच सदस्य उपस्थित असल्याने सभेचे कामकाज अर्धा तासासाठी पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी अंदाजपत्रकासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा असताना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार का उपस्थित नाहीत, अशी विचारणा केली. उच्च न्यायालयातील एका खटल्याला हजर राहायचे असल्याने आयुक्तांना मुंबईला जावे लागल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर संजय बालगुडे यांनी सभागृहातील कोरमची नगरसचिवांकडे विचारणा केली.महापालिकेतील सभागृहाच्या रजिस्टरमध्ये सह्या करून सभागृहात बसलेल्या मनसे व काँग्रेसच्या सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचा निरोप दिला. त्यानुसार एक -एक करून त्यांचे सभासद बाहेर पडले. काँग्रेसच्या सभासद सुनंदा गडाळे सभागृहात येत असताना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी इशारा करून त्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानुसार त्याही बाहेर गेल्या. सभागृहातील काँग्रेस व मनसेकडून सभासदांना बाहेर पाठवून सभेचे कोरम भरू न देण्याचा प्रकार पाहून सभागृह नेते बंडू केमसे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. काँग्रेस व मनसेने शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणे अपेक्षित असताना सभासदांना परत पाठवून रडीचा डाव खेळल्याची जोरदार टीका त्यांनी केली. सभागृहात ज्या पक्षाचे सभासद आले होते, त्यांनी रजिस्टरवर सह्यादेखील केल्या आहेत. त्यांची नावे मोजण्याची मागणी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी केली. त्या वेळी रजिस्टरवर ६० सह्या असताना अनेक सभासद कोरम भरू नये, याकरिता बाहेर गेले असल्याचे स्पष्ट झाले. महापौरांनी कोरम घेण्याचे आदेश नगर सचिवांना दिले. त्यानुसार कोरम पूर्ण होण्यासाठी ५५ सदस्य आवश्यक असताना सभागृहात ४३ सदस्यच उपस्थित असल्याने दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) दुपारी एकपर्यंत सभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले.