शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खासदार वंदना चव्हाण राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष

By admin | Updated: May 14, 2016 00:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना कायम करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी महापौर प्रशांत जगताप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना कायम करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी महापौर प्रशांत जगताप यांना या निवडीची घोषणा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिका निवडणुका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालीच लढविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा चव्हाण यांच्याकडे आहे. मात्र, खासदार आणि शहराध्यक्ष ही दोन्ही पदे असल्याने वर्षभरापूर्वी चव्हाण यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महापौर बदलानंतर तसेच भाजप आणि काँग्रेसकडून महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्ष बदलल्यानंतर राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडूनही पालिका निवडणुकीसाठी शहराध्यक्ष बदलण्याची मागणी होत होती. त्यानुसार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. शहराध्यक्ष निवडीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्याचा निर्णय झाला होता. या पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार अनिल भोसले, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, विद्यमान कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, अप्पा रेणुसे, सुभाष जगताप इच्छुक होते. पुण्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत बैठकीला उपस्थित असलेल्या शरद पवार यांनी शहराध्यक्षपदी वंदना चव्हाण यांनाच कायम केले असल्याचे महापौर जगताप यांना सांगितले.