शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सभासद आक्रमक; संचालक निरूत्तर

By admin | Updated: September 13, 2014 05:29 IST

आक्रमक सभासद व निरूत्तर संचालक मंडळ अशीच परिस्थिती आज दिवसभर सोमेश्वरच्या वार्षिक सभेत दिसून आली

सोमेश्वरनगर : आक्रमक सभासद व निरूत्तर संचालक मंडळ अशीच परिस्थिती आज दिवसभर सोमेश्वरच्या वार्षिक सभेत दिसून आली. खंडाजंगी वातावरणात पार पडलेल्या या सभेत अध्यक्षांनी शेवटी कहरच केला. त्यांच्या मनमानीचा शेतकऱ्यांनी निषेध केला. गोंधळातच या सभेची सांगता झाली. आज सोमेश्वर ची वार्षीक सभा पार पडली. त्यावेळी काही विषय शिल्लक होते. उर्वरित सहा विषयांवर चर्चा करण्यासाठी आजची सभा तहकुब करून उद्या घ्या, अशी मागणी सभासदांनी केली मात्र स्वत: अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी विषय पत्रिका वाचण्यास सुरूवात केली आणि काही सभासदांनी मंजूर, मंजूर म्हणत सभेची सांगता केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सभासद शेतकऱ्यांनी अध्यक्ष या मनमानीचा जाहीर निषेध केला. सेवा संघाची कागदपत्रे, आॅडीट रिपोर्ट, गेल्या सेभेचा विषय नंं. १ व ३ नामंजूर करावा, उचललेले कर्ज, अहवालातील दाखविलेले ५२ कोटी बोगस आहेत. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सर्वसाधारण सभेत सभासद शेतकऱ्यांनी केली. त्यावर संचालक मंडळ निरूत्तर झाले. सभासदांचे समाधान होण्यासारखी उत्तरे संचालक मंडळाकडून सभागृहाला मिळाली नाहीत. त्यामुळे ही सभा तहकूब करून उद्या परत सभा बोलवावी अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी केली. दुपारी १ वाजता सोमेश्वर कारखान्याच्या ५० व्या वार्षीक सभेला शिवाजी प्रांगणात सुरूवात झाली. गेल्या १० वर्षाच्या इतिहासात पहील्यांदाच एवढया मोठया प्रमाणात सभासदांनी हजेरी लावली होती. सभेच्या सुरूवातीला अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. कदाचित ही सोमेश्वर कारखान्याची शेवटची सभा असणार आहे. कारखान्याच्या संस्थापकांची अब्रु या संचालक मंडळाने घालविली आहे. चार वर्षापासून सांगत होतो सोमेश्वर कर्जात चाललाय. मात्र मंजूर मंज़ूर ची नुसती घाई लागली होती. प्रतापगड कारखान्यावर गरज नसताना ८ कोटी ८२ लाख खर्च केला. एका वेळेस अनेक बँकांची कर्ज काढता येत नसताना या संचालकानी एका वेळी तीन बँकांची कर्जे काढली. त्यांनी बँक, सरकार व सभासदांची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर फौजदारी का करू नये. बेसल डोसचे कारखान्यावर अजून ७३ कोटी ४० लाख कर्ज आहे. त्यामुळे गेल्या सभेच्या अहवालातील विषय क्र १ व ३ वगळता इतर विषय मंजूर करावेत असे सांगतले यावर सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता. पहील्या विषयावर तब्बल सहा तास चर्चा रंगली. यावर अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी मागील अहवालात दुरूती करणे कसे शकय आहे. गेल्या चार वर्षात ५८ कोटी रूपयांचा खर्च टाकणे राहून गेला होता. तो या अहवालात सभासदांपुढे मांडला आहे. त्यामुळे विषय क्रमांक १ ला मंजूरी द्यावी. यावर सतिश काकडे यांनी मतदान घेण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष जगताप यांनी मतदानाची वेळ येऊ न देता हा कारखाना आपल्याला चालवयाचा आहे. सद्या कारखान्यापुढे अडचणी आहेत त्यातून मार्ग काढला पाहीले असे स्पष्ट केले. यावर सतिश काकडे म्हणाले, कारखाना संचालक मंडळाने अडचणीत आणला. अहवालातील ५२ कोटी रूपये हे बोगस असल्याचा आरोप सतिश काकडे यांनी केल्यावर अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी संचालक मंडळाने जर भष्ट्राचार केला असेल तर सर्वात पहीला मी राजीनामा देईन. विषय नामंजूर करून कारखाना अडचणीत आणायचाय काय? जमा खर्च सभासदांपुढे मांडलेला आहे, असे जगताप म्हणाले, त्यावर सरकारी आॅडीट अणणार असल्याचे सतिश काकडे यांनी सांगीतले. कारखान्यात गेल्या २२ वर्षात संवा संघात घोटाळे, बोगस व्हाऊचर यामुळे खरा सोमेश्वर अडचणणीत आला आहे. आता संचालक मंडळाला सोडणार नाही. त्यांना बेडया ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही. सेवा संघाचा सचिव, कागदपत्रे व आॅडीट रीपोर्ट मागवा तो पर्यंत ही सभा तहकूब करून दोन दिवसांनी पुन्हा बोलावू, असे काकडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अध्यक्ष जगताप यांनी सरळ विषय पत्रिकेचेच वाचन सुरू केले आणि काही सभासदांनी मंजूर, मंजूर अशा घोषणा देत गोंधळातच सभेची सांगता केली.