शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी बाणा कार्यक्रमाबरोबर रंगणार मेगा बंपर लकी ड्रॉ

By admin | Updated: November 28, 2015 00:53 IST

‘लोकमत’ आयोजित ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचा १३ आॅक्टोबर घटस्थापनेपासून भव्य शुभारंभ झाला आणि दिवाळीपर्यंत खरेदीचा आणि बक्षिसे जिंकण्याचा आनंद

पुणे : ‘लोकमत’ आयोजित ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचा १३ आॅक्टोबर घटस्थापनेपासून भव्य शुभारंभ झाला आणि दिवाळीपर्यंत खरेदीचा आणि बक्षिसे जिंकण्याचा आनंद आणि उत्कंठा उत्तरोत्तर वाढत गेली. पुणेकरांना खरेदी करताना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आहे ‘लोकमत दीपोत्सव २0१५ मुळे.’ या योजनेचे यशस्वी हे चौथे वर्षे आहे.१३ आॅक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत सहभागी झालेल्या व्यावसायिकांकडून खरेदी केल्यास अनेक बक्षिसांची लयलूट होणार होती.या योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १००हून अधिक व्यावसायिकांनी सहभाग घेतला, तर लाखो पुणेकरांनी यात भाग घेत आपल्या खरेदीचा आनंद व्दिगुणित केला. या योजनेच्या मेगा बंपर लकी ड्रॉ सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे चौरंग निर्मित अशोक हांडे दिग्दर्शित ७० एमएम ‘मराठी बाणा.’ या भव्य कार्यक्रमात मराठमोळ्या संस्कृतीचे गायन, वादन, नृत्य अशा कलाविष्कारातून उपस्थितांना दर्शन होणार आहे.सर्व बक्षिसांचा लकी ड्रॉ सोहळा या भव्य कार्यक्रमात होणार आहे. तसेच, या एक महिन्याच्या कालावधीमध्ये दोन साप्ताहिक सोडतींचाही समावेश होता. त्यामध्ये प्रत्येक आठवड्यात व्हिडीओकॉन यांच्यातर्फे पहिले बक्षीस म्हणून दोन ३२’’ एलईडी टीव्ही, तर ९९९० रु. किमतीच्या युनिकेअर वॉटर ट्रीटमेंट प्लांट यांच्या ५ वॉटर प्युरिफायरचा समावेश आहे.पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातील मुख्य बक्षीस विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळाही या कार्यक्रमात होणार आहे. (प्रतिनिधी)हा सोहळा मुख्यत: लोकमत दीपोत्सव योजनेत सहभागी व्यावसायिकांसाठी आणि सखी मंच सदस्यांसाठी आयोजित केला आहे. सखी मंच सभासदांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका दि.२९ नोव्हेंबरपासून निवडक केंद्रांवर मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील.त्याबद्दलची सविस्तर माहिती उद्याच्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध केली जाईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.